आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'शोले'च्या सुरमा भोपालीची स्टायलिश मुलगी, लवकरच करु शकते बॉलिवूड पदार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडच्या विनोदवीरांचा उल्लेख होताच जॉनी लिव्हर, मेहमूद, असरानी, कादर खान, शक्ती कपूर आणि सूरमा भोपाली अर्थातच जगदीप जाफरी यांच्या नावांचा आवर्जुन उल्लेख होतो. या सर्व विनोदवीरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. यापैकी अनेकांच्या मुलांनीसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. या यादीत आणखी एका सेलिब्रिटी किडच्या नावाचा समावेश होणार आहे. 'शोले' या चित्रपटात 'सुरमा भोपाली' ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते जगदीप जाफरी यांची मुलगी मुस्कान जाफरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. 

 

जावेद-नावेद यांची सावत्र बहीण आहे मुस्कान...

- जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे दोघे कॉमेडियन जगदीप जाफरी यांची मुले आहेत. या दोन मुलांव्यतिरिक्त त्यांना एक मुलगी असल्याचे फार क्वचित लोकांना ठाऊक आहे.

- जावेद आणि नावेद ही जगदीप आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत. तर मुस्कान ही जगदीप आणि त्यांची दुसरी पत्नी नाजिमा यांची मुलगी आहे. या नात्याने मुस्कान ही जावेद आणि नावेद यांची सावत्र बहीण आहे.
- मुस्कान एक मॉडेल आहे. याशिवाय ती गायिका, व्हॉइस ओव्हर आणि डबिंगचेही काम करते. तिचा फॅशन सेन्ससुद्धा लाजवाब आहे.
- मुस्कानने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली नाही. पण काही टीव्ही शोजमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केले आहे.

 

आमिर खानच्या मुलासोबत केलंय मुस्कानने काम...

- मुस्कानने आमिर खानचा थोरला मुलगा जुनैदसोबत काम केले आहे. या दोघांनी 'मदर करेज अँड हर चिल्ड्रन' नावाच्या एका नाटकात काम केले होते.
-  या नाटकानंतर जुनैद आणि मुस्कान यांच्या अभिनयाची चर्चा झाली होती. आता मुस्कान बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु झाली असून अद्याप याविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही.
- मुस्कानचे वडील जगदीप यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, जगदीप जाफरी यांची लेक मुस्कानचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...