आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' बोल्ड अभिनेत्रीसोबत मिका सिंगला करायचे आहे लग्न, अभिनेत्रीने त्यावर दिले असे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिका सिंगचे बॉलिवूड तसेच पंजाबी इंडस्ट्रीत मोठे नाव आहे.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे प्रत्येक गाणे हिट होते. मिकाचा आवाज त्यांच्या चाहत्यांवर नेहमीच भूरळ पाडतो. मिका सिंग सध्या अविवाहीत आहे पण काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की मिका एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. 

 

मिकाने काही दिवसांपूर्वी तो लग्न करणार असल्याचे सांगितले होते आणि त्याला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न करण्यास आवडेल असे विचारले असता त्याने त्याला उर्वशी रौतेलासोबत लग्न करण्यास आवडेल असे सांगितले होते. उर्वशीने सनम रे यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे.

 

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाते आणि तिच्या सौंदर्याची भूरळ मिकालाही पडली. लग्नाबाबत उर्वशीला विचारले असता तिने सांगितले की, माझा लग्न करण्याचा सध्या तरी विचार नाही. माझ्या चुलत भावा-बहिणींचे लग्न झाल्यानंतरच मी लग्न करणार आहे. उर्वशी आणि मिकामध्ये जवळपास 17 वर्षाचे अंतर आहे.उर्वशी आणि मिकाच्या अफेअरच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे नंतर समजले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्वशी-मिकाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...