आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

41 वर्षांचा झाला मिका सिंग, बोल्ड गाणी आणि राखीला KISS करुन एकवटली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'शेक दैट बूटी..', 'ए गणपत...चल दारू ला', 'बिट्टू सबकी लेगा रे...', 'इश्क की मां की', 'सारी दुनिया मेरे इस पे' यांसारख्या कॉन्ट्रोव्हर्शिअल गाण्यांना स्वरबद्ध करुन आपला बिनधास्तपणा दाखवणारा आणि 'इब्ने-बतूता', 'ढिंका चिका', 'बन गया कुत्ता' आणि 'दिल में बजी गिटार' यांसारख्या गाण्यांना आपला अन-कन्वेंशनल आवाज देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गायक मिका सिंग आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंग इंडस्ट्रीतील अशा गायकांपैकी एक आहे, ज्याचे एक गाणे सिनेमाच्या यशाला मोठा हातभार लावत असते. 
मस्तमौला अंदाज, अन-कन्वेंशनल आवाज आणि वादविवादांशी जुने नाते, हीच कदाचित मिकाची खरी ओळख आहे. मिका कितीही वादात अडकला असला तरी त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही.

 

मिका आणि राखी सावंत वाद
मिका आणि वादाचे तसे जुनेच नाते आहेत. कधी को-स्टारला किस करने असो वा छेडछाड यामुळे तो वादात अडकला आहे. 2006 मध्ये आयटम गर्ल राखी सावंतला मिकाने आपल्याच बर्थडे पार्टीत सर्वांसमोर किस केले होते. त्याच्या या लिपलॉकमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. या कारणामुळे राखी न्यायलयातसुद्धा गेली होती. अनेक दिवस हे प्रकरण मीडियात गाजले.


इतकेच नाही तर 'इस जंगल से मुझे बचाओ' या शोदरम्यान मिकाने अभिनेत्री आणि मॉडेल निगार खानलासुद्धा किस करुन वादाला तोंड फोडले होते. मिकाला लोकांनी माफी मागण्यास सांगितले होते, कारण त्याने टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये असे लाजिरवाणे कृत्य केले होते. मात्र मिकाला आपल्या वागण्यावर मुळीच पश्चाताप झाला नाही. विशेष म्हणजे मिकाने राखीची खिल्ली उडवण्यासाठी एक गाणेसुद्धा तयार केले होते. त्याचे शब्द होते, ऐ भाई तूने पप्पी क्यों ली'


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, मिका सिंगशी निगडीत आणखी काही वाद...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...