आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • मिलिंद सोमण, अंकिता कंवर, Milind Soman Ankita Konwar Wedding At Alibaug

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरु झाली मिलिंद सोमणच्या लग्नाची तयारी, 27 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत येथे घेणार सप्तपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 52 वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 27 वर्षीय गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत 21 एप्रिल रोजी अलिबाग येथे मिलिंद लग्न थाटतोय. लग्नात दोघांच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. लग्नाच्या तयारीचे काही फोटोज समोर आले आहेत. यापैकी एका फोटोत अंकिताच्या हातावर मेंदी लागली असून तिने मिलिंदचा एक डोळा बंद केलेला दिसतोय. तर इतर फोटोजमध्ये लग्नस्थळ फुलांनी सजलेले दिसत आहे. 


मिलिंदचे दुसरे लग्न.. 
- मिलिंद सोमणचे हे दुसरे लग्न आहे.
- मिलिंदने जुलै 2006 मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत लग्न थाटले होते.
- लग्नाच्या तीन वर्षांतच दोघे विभक्त झाले. 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
-  मागील दीड वर्षांपासून मिलिंद अंकिताला डेट करत आहे. या नात्याने दोघांचेही कुटुंबीय आनंदी आहेत.
- अंकिता दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
- 2013 मध्ये तिने एअर एशियात केबिन क्रू केबिन एग्झिक्यूटिव म्हणून नोकरी सुरु केली होती. तिला आसामीशिवाय हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि बंगाली भाषा येते.
- नोव्हेंबर 2015 मध्ये अंकिताने मिलिंदसोबत तिचे पहिले मॅरेथॉन पूर्ण केले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, मिलिंद-अंकिताच्या लग्नाच्या तयारीचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...