आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सलमानच्या \'Race 3\' चे मायनस पॉईंट्स, \'रेस\'च्या सिरीजमध्ये मागे पडली फिल्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
आर बिझनेस इज आर बिझनेस, नन ऑफ यूआर बिझनेस असे लक्षवेधी संवाद असले अन्  परदेशातील उत्तम लोकेशन्स, रोहित शेट्टीच्या चित्रपटांप्रमाणे महागड्या गाड्या अन तगडी स्टारकास्ट असली तरीही कमकुवत कथानकामुळे सिरीजमध्ये मागे पडली रेस 3. दिग्दर्शक रेमो डिसुजाचा हा चित्रपट फक्त सलमानचे फॅन्स तारुन नेऊ शकतात. 

 

फक्त सलमानचे फॅन्स एन्जॉय करु शकतील चित्रपट... 
रंजक आणि रहस्यमयी शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारे कथानक, जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद यामुळे रेस सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. मात्र, रेस ३ या तूलनेत खूपच मागे पडला. सर्व गोष्टी निगेटिव्ह असताना यामध्ये एक गोष्ट लक्षात राहते ती म्हणजे चित्रपटाचे संवाद. “ आर बिझनेस इज आर बिझनेस, नन ऑफ यूआर बिझनेस’ आणि ‘ ये जिस रेस से मुझे बाहर करना चाह रहे है, उस रेस का असली सिकंदर मै हू’ असे संवाद टाळ्या घेतात. सलमानचे फॅन हा चित्रपट खूप एन्जॉय करु शकतात. पण, चित्रपट रसिक असाल तर ही कथा तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही. डेझी शहा आणि शाकीब सलीम वगळता सर्वांचे ठोकळेबाज अभिनय आहेत. बॉबी देवल यानिमित्ताने बरेच वर्षांनी रूपेरी पडद्यावर आला. त्याला या चित्रपटातून पुन्हा एकदा स्वत: सिद्ध करण्याची संधी होती मात्र, त्याला ते करता आलेले नाही. अर्थात, त्याच्या मूळ अॅक्शन जोनरमध्ये तो अगदी फिट बसला आहे. सलमान आणि त्याचे व्दंव्दयुद्ध, ते ही शर्टलेस पाहणे एक भन्नाट अनुभव आहे. 

 

पुढे वाचा, चित्रपट कुठेकुठे पडला मागे... 

 

बातम्या आणखी आहेत...