आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अशी दिसते मिथून चक्रवर्तींच्‍या मुलाची बायको, या हिंदी सिनेमात केले आहे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथून चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती म्‍हणजेच मिमोहचे अखेर लग्‍न झाले. बलात्‍काराच्‍या आरोपामुळे त्‍याच्‍या विवाहावर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले होते. मात्र शनिवारी 7 जुलै रोजी त्‍याने अॅक्‍ट्रेस मदालसा शर्मासोबत कोर्ट मॅरेज केले. आज मंगळवारी त्‍यांचा विवाह समांरभ होणार आहे.

 

दरम्‍यान एका भोजपुरी अॅक्‍ट्रेसने महाक्षयवर बलात्‍कार, फसवणूक व जबरदस्‍तीने गर्भपात करायला लावल्‍याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. त्‍यानंतर दिल्‍लीच्‍या रोहिणी कोर्टाने महाक्षय व त्‍याची आई योगिता बालीविरोधात एफआयआर दाखल करण्‍याचे आदेश पोलिसांना दिले होते. शनिवारी 7 जुलैरोजी कोर्टाने दोन्‍ही आरोपींना अग्रीम जामीन मंजूर केला होता. त्‍याच दिवशी महाक्षय व मदालसा शर्मा यांनी कोर्ट मॅरेज केले.

 

काय करते मदालसा शर्मा
मदालसा शर्मा अॅक्‍टींग तसेच मॉडेलिंग करते. 2009चा तेलगू सिनेमा 'फिटींग'द्वारे तिने डेब्‍यु केला होता. हिंदी सिनेमा 'शौर्य'मध्‍येही तिने अॅक्टिंग केली आहे. याशिवाय एका कन्‍नड सिनेमातही तिने काम केले आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, मदालसा शर्माचे सुंदर फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...