आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणपणी फारच देखणी होती मिथुन यांची पहिली पत्नी हेलेन, प्रेमात धोका मिळाल्यानंतर निघून गेली विदेशात!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  आज बॉलिवूडचे डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. फार कमी लोकांना माहीत की मिथून यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. केवळ अभिनेताच नाही तर त्यांनी दिग्दर्शक, गायक, लेखक, समाजसेवी, बिझनेसमन, राजकारणी या सर्च क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. 16 जून 1952 रोजी बरिसल येथे जन्मलेल्या मिथून यांचे लव्ह लाईफ त्यावेळी चर्चेचा विषय होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पहिल्या पत्नीविषयी आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. 

 

मिथून यांची पहिली पत्नी अभिनेत्री होती. तिचे नाव आहे हेलेना ल्युक. सत्तरीच्या दशकात हेलेना फॅशन वर्ल्डमध्ये प्रसिद्ध असे नाव होते. 1980 साली त्यांनी जुदाई या चित्रपटात अभिनयही केला होता. यावेळी चित्रपटात ती साईड रोल करताना दिसत असे.


यानंतर हेलेनाने अजून दोन चित्रपट म्हणजेच 'साथा साथ' आणि 'एक नया रिश्ता' चित्रपटात काम केले पण हेलेना जास्त काळ बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही. हेलेना केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी होती. मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न होण्याअगोदर हेलेनासोबत लग्न केले होते. हेलेनाशी लग्न करण्याच्या अगोदर मिथुन यांचे अफेअर अभिनेत्री सारीकासोबत होते पण तिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन नवीन सहारा शोधत होते.


पुढच्या स्लाईडवर वाचा, कशी झाली हेलेना आणि मिथुन यांची भेट..

बातम्या आणखी आहेत...