आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरचा भाचा GFसोबत चढला बोहल्यावर, मुलीसोबत गॉर्जिअस लूकमध्ये दिसली श्रीदेवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोनी कपूर आणि अनिल कपूर यांचा भाचा (बहिणीचा मुलगा) मोहित मारवाह त्याची गर्लफ्रेंड अंतरा मोतीवालासोबत मंगळवारी विवाहबद्ध झाला. मोहितच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत. दुबईत झालेल्या या लग्नाला कपूर कुटुंबातील सर्व लोक सहभागी झाले होते. बग्गीत बसून मोहित विवाहस्थळी दाखल झाला. क्रिम कलरची शेरवानी आणि चुडीदार पायजामात मोहित शोभून दिसला. बग्गीच्या शेजारी लाल रंगाचा फेटा घालून संजय कपूर थिरकताना दिसले. तर दुसरीकडे वधू अंतरा लाइट पिंक कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली. 


लग्नात सहभागी झाले हे सेलेब्स...
मोहितच्या लग्नाता अनिल कपूर, संजय कपूर, श्रीदेवी, बोनी कपूर, सीमा खान, सोनम कपूर, करण जोहर, बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत सोनम कपूर, शनाया कपूर, अथिया शेट्टी, अर्जुन कपूर, कियारा अडवाणी, श्वेता बच्चन, करिश्मा कपूर, महीप कपूर, खुशी कपूर, अंशुला कपूर सह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. लग्नाचा एक फोटो श्रीदेवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोला तिने कॅप्शन दिले,  'Antara Marwah❤️❤️😘😘'.


कोण आहे अंतरा मोतीवाला?
- मोहितची पत्नी अंतरा मोतीवाला अंबानी कुटुंबीयांची नातेवाईक आहे.
- अंतरा ही अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानींच्या बहिणीची मुलगी आहे. या नात्याने ती अनिल आणि टीना यांची भाची आहे.
- मोहितने 2014 मध्ये 'फगली' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, मोहित मारवाहचे वेडिंग फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...