आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवीला डॉक्टर बनवू इच्छित होती श्रीदेवी, बोनी कपूर यांच्या म्हणण्यावर दिली होती अॅक्ट्रेस व्हायची परवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची थोरली कन्या जान्हवी कपूर हिचे 'धडक' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले आहे. शशांक खेताना दिग्दर्शित हा चित्रपट 20 जुलै 2018 रोजी रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळात जान्हवीने एका मुलाखतीत अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या... 

 

मी डॉक्टर व्हावे, अशी होती आईची इच्छा
जान्हवीने मुलाखतीत सांगितले, 'जेव्हा मी आईकडे अभिनेत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी आमच्यात बरेच संभाषण झाले होते. आई खरं तर यासाठी तयार नव्हती. पण माझी अभिनयात रुची निर्माण झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. मला डॉक्टर करायची तिची इच्छा होती. पण आज मी आईला सॉरी म्हणू इच्छिते, कारण त्यावेळी माझ्यात डॉक्टर बननण्याचा समजूतदारपण नव्हता.'

 

-जान्हवी पुढे म्हणाली, 'मी अभिनय क्षेत्राची निवड केल्याचा निर्णय घेतल्याने आई टेन्शनमध्ये होती. पण वडिलांनी तिला मेंटली प्रिपेअर केले. माझ्या वडिलांचा माझ्या करिअर निवडीसाठी कायम पाठिंबा राहिला आहे. त्यांच्या सांगण्यावरुनच आईने मला या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली होती.'

 

- जान्हवीने सांगितले, "मी आणि खुशीने आयुष्य आरामात जगावे, अशी आईची इच्छा होती. तिचे म्हणणे होते,  तिच्या मुलींनी त्यांचे आयुष्य ऐशोआरामात जगावे, यासाठी तिने खूप संघर्ष केला होता, तो संघर्ष कधीही तिच्या मुलींच्या वाट्याला येऊ नये, यासाठी ती प्रयत्न करत होती." पण जान्हवी म्हणाली, की मी समाधानी व्यक्ती नाही. आईवडिलांच्या पैशांवर संपूर्ण आयुष्य मला जगायचे नाही. 

 

-जान्हवीने सांगितले, की  या चित्रपटाने मला आईच्या निधनाच्या धक्क्यातून सावरायला खूप मदत केली. यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचे निधन झाले होते.  

बातम्या आणखी आहेत...