आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे नागार्जुनची सून, एकेकाळी करायची पार्ट टाइम जॉब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद: साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांची सून समांथा अक्किनेनी हिचा आज वाढदिवस असून ती 31 वर्षांची झाली आहे. 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नईत जन्मलेल्या समांथाने 6 ऑक्टोबर 2017 रोजी नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न केले. द नेटवर्थ पोर्टलनुसार, समांथा 11 मिलियन डॉलर अर्थातच 70 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याजवळ चेन्नईत एक स्वतःचा बंगला असून हैदराबाद येथेही एक घर आहे. याशिवाय बीएमडब्ल्यू एक्स3 आणि जगुआर एक्सएफ या लग्झरी गाड्यासुद्धा आहेत. 


एका चित्रपटासाठी दोन कोटी घेते समांथा...
- रिपोर्ट्सनुसार, समांथा एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते.  
- याशिवाय जाहिराती, प्रॉडक्ट लाँच आणि इनॉर्गेशन इव्हेंटमधूनही कमाई करते. ज्वेलरी ब्रॅण्ड, साबण, फुटविअरच्या प्रमोशनमधून समांथाची कमाई होते. समांथा तिच्या कमाईतील एक भाग एनजीओला डोनेट करते.


एकेकाळी उदरनिर्वाहासाठी पार्ट टाइम जॉब करायची समांथा...
सुरुवातीच्या काळात समांथाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. याचकारणामुळे तिने अनेक दिवस लहान-मोठे पार्ट टाइम जॉब केले होते. त्यानंतर ती मॉडेलिंग क्षेत्रात आली. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक रवी वर्मन यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला 'मास्कोविन कावेरी' या चित्रपटाची ऑफर दिली. हा तिचा डेब्यू चित्रपट होता.


पुढे वाचा, 'मनम'मध्ये समांथाने साकारली होती नागार्जुनच्या आईची भूमिका... 

बातम्या आणखी आहेत...