आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा बांग्लादेशाच्या सनी लिओनीला, बिकिनी घातल्याने उठली होती टीकेची झोड, झाली होती शिवीगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनी लियोनी भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. पण आज आम्ही तुमची भेट बांग्लादेशाच्या सनी लिओनीशी घालून देत आहोत. मॉडेल असलेल्या नायला नईम हिला बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे बांग्लादेशाची सनी लिओनी असे म्हटले जाते. येथे नायलाची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे.

 

23 वर्षांची आहे नायला... 
नायलाचा जन्म 14 डिसेंबर 1995 रोजी बरीसल, बांग्लादेशात झाला. रॅम्प मॉडेलिंगद्वारे तिने करिअरचा श्रीगणेशा केला आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

- अल्पावधीतच नायलाना बांग्लादेशातील एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अनेक नामांकित ब्रॅण्ड्सासाठी तिने मॉडेलिंग केले आहे.

 

बिकिनी घातल्याने उठली होती टीकेची झोड...

- नायला बिकिनी परिधान करायला घाबरत नाही. अनेक ब्रॅण्ड्साठी बिकिनीत तिने पोज दिल्या आहेत. पण यामुळे तिला टीकेला मात्र सामोरे जावे लागले. टीकेची झोड तिच्यावर उठली होती.

- सोशल मीडियावर लोकांनी तिच्याविषयी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. इतकेच नाही तर काहींनी तिला शिवीगाळदेखील केली होती.

 

अभिनयाची आहे आवड...

- नायलाला अभिनयाची आवड आहे. तिने काही टीव्ही प्रोग्राम्ससह चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 - 'घाट बाबू निताई चंद्र' या बांग्ला शोमध्ये नायला झळकली होती. हा शो सुनील गंगोपया यांच्या 'घाट बाबू' या लोकप्रिय नॉवेलवर आधारित होता.

- 'रन आउट' हे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव असून यात तिने आयटम नंबर केला होता. त्यानंतर ती 'मारुफ ताका धोरेना' या चित्रपटातही झळकली.

 

उच्चशिक्षित आहे नायला...

नायलाने कमी वयातच मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले असले, तरी त्याचा परिणाम शिक्षणावर होऊ दिला नाही. नायलाने ढाका सिटी डेंटल कॉलेज येथून बीडीएस पूर्ण केले आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, बांग्लादेशाची सनी लिओनी म्हणून ओळखल्या जाणा-या नायलाचे निवडक Photos... 

बातम्या आणखी आहेत...