आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : श्वेता तिवारीची ऑनस्क्रिन मुलगी आता झाली 21 वर्षांची, पाहा तिचा हटके अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील गाजेलल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी स्नेहाची भूमिका साकारणारी बालकलाकार नक्कीच तुमच्या लक्षात असेल ना... ही भूमिका श्रेया शर्माने साकारली होती. वयाच्या तिस-या वर्षी अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करणा-या श्रेयाला 'रसना गर्ल' या नावानेही ओळखले जाते. आज श्रेयाचा वाढदिवस आहे. 9 एप्रिल 1997 रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे जन्मलेली श्रेया आता 21 वर्षांची झाली आहे. बालपणापासूनच ती छोट्याच नव्हे तर मोठ्या पडद्यावर झळकत आहे.

 

श्रेयाने रजनीकांत, शाहरुख व चिरंजिवीसोबत केला अभिनय....

- श्रेयाचे फेसबुकवर अडीच लाखांहून जास्त फॅन्स आहेत.
- श्रेयाने रजनीकांत, शाहरुख व चिरंजीवीच्या सिनेमांमध्ये काम केले आहे.
- श्रेया तेलुगु सिनेमात टॉप लीड अॅक्ट्रेसची भूमिका साकारत आहे.
- तेलुगु चित्रपट "निर्मला कान्व्हेंट" बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे.

 

LLB आहे श्रेया, बॉलिवूडमध्ये करणार एंट्री...
- मुंबईत कायद्याचे शिक्षण घेतलेली श्रेया आता लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
- विकास शर्मा यांनी सांगितले की, पालमपूरमध्ये फिल्म स्टूडिओ सुरु करण्याची श्रेयाची इच्छा आहे.

 

श्रेयाने कोणकोणत्या फिल्म्स, सीरिअल्समध्ये केलंय काम, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच पाहा तिची लेटेस्ट छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...