आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nawazuddin Actress Shweta Tripathi To Marry Rapper Chaitanya Sharma Aka SlowCheetah

5 वर्षांनी लहान BF सोबत लग्न करतेय ही अभिनेत्री, गोव्यामध्ये होणार डेस्टिनेशन वेडिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'मसान', 'हरामखोर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी लवकरच लग्न करणार आहे. श्वेता आपला बॉयफ्रेंड आणि अॅक्टर-रॅपर चैतन्य शर्मासोबत 29 जूनला लग्न करणार असे वृत्त आहे. विशेष म्हणजे चैतन्य हा श्वेतापेक्षा 5 वर्ष लहान आहे. चैतन्य म्हणतो की, श्वेता वयाच्या 32 व्या वर्षीही खुप तरुण दिसते. श्वेताने 'हरामखोर' चित्रपटात नवाजुद्दीनसोबत अनेक इंटीमेट सीन्स दिले आहेत.


चैतन्यने श्वेताला असे केले प्रपोज...
- चैतन्य सांगतो की, " मुंबईमध्ये अॅक्टिंग वर्ल्डमध्ये काम करण्यासाठी आलो होतो. त्यावेळी आम्ही भेटलो. एका कॉन्सर्ट दरम्यान आमची भेट दिल्लीमध्ये झाली."
- परतत असताना आमच्या दोघांची सीट समोरा समोर होती. सकाळी 5 वाजेपर्यंत प्लेन लँड होणार होते. तेव्हाच आमचे बोलणे सुरु झाले आणि नंबर एक्सजेंज झाले.
- श्वेता सांगते की, "चैतन्यने एक रोमँटिक प्रपोजल दिले होते. त्याने 'कुक्कू कल्ब' नावाच्या एका ठिकाणी मला प्रपोज केले होते. हे मुंबईचे परफॉर्मिंग प्लेस आहे."
- त्या स्टेजवर मला प्रपोज केले होते. कारण आम्ही एका प्लेच्या कामानिमित्त भेटलो होतो. त्याने मला सांगितले की हा त्याचा नवीन प्ले आहे. जेव्हा मी तिथे गेले त्याने मला प्रपोज केले.


गोव्यात होणार डेस्टिनेशन वेडिंग
- लग्नाविषयी बोलायचे झाले तर श्वेता आणि चैतन्यचे लग्न गोव्यात होणार आहे.
- या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये फक्त जवळचे मित्र आणि नातेवाइक सहभागी होतील.
- दिल्लीचे माजी चीफ सेक्रेटरी पी. के. त्रिपाठीची मुलगी श्वेता मुंबईला आली होती. परंतू तिला कधीच बॉलिवूड अॅक्ट्रेस बनायचे नव्हते.
- तिला थिएटरवर प्रेम होते. परंतू नंतर ती चित्रपटात पोहोचली. सुरुवातीला तिने डिज्नी चॅनलच्या 'क्या मस्त है लाइफ', शॉर्ट फिल्म आणि टीव्ही कमर्शिअलमध्ये काम करायची.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्वेता त्रिपाठी आणि चैतन्यचे काही रोमँटिक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...