आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Stars Struggling Life नवाजुद्दीन होते वॉचमन, भांडी धुवायचा अक्षय, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी हे काम काय करायचे Stars

नवाजुद्दीन होते वॉचमन, भांडी धुवायचा अक्षय, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी हे काम काय करायचे Stars

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड स्टार्सच्या संदर्भातील छोट्यातील छोटी गोष्ट मोठी बातमी होत असते. हे सेलिब्रिटी काय करतात त्यांच्या खासगी आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी हे कलाकार नेमके काय करायचे हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. कुणी करिअरच्या सुरुवातीच्या काळात वॉचमन म्हणून काम केले, तर कुणी बस कंडक्टर आणि वेटर म्हणून काम केले. यापैकीच एक आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. त्यांनी नुकताच आपला 44 वा वाढदिवस (19 मे) साजरा केला.

 

वॉचमन म्हणून काम करायचे नवाजुद्दीन...
नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "माझे वडील शेतकरी होते. आईवडील, सात भाऊ आणि दोन बहिणी असे आमचे कुटुंब.. वडिलांची इच्छा होती, की खूप शिकावे. हलाखीच्या परिस्थितीत हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी युनिव्हर्सिटीतून मी विज्ञान शाखेत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षणानंतर नोकरी मिळत नव्हती. दोन वर्षे नोकरी शोधण्यात गेली. पुढे वडोदाच्या पेट्रोलियम कंपनीत दीड वर्षे नोकरी केली. ती नोकरी धोकादायक होती. अनेक प्रकारच्या केमिकलचे टेस्टिंग करावे लागायचे. नंतर ती नोकरी सोडली आणि दिल्लीत आलो. येथे पुन्हा नोकरीचा शोध घेतला. काम मिळाले नाही. एकेदिवशी एका मित्रासोबत एक नाटक बघायला गेलो. ते नाटक बघून अतिशय आनंद वाटला. त्यानंतर अनेक नाटकं पाहिली. हळूहळू रंगभूमीविषयी जवळीक निर्माण झाली. मग मी साक्षी नावाचा एक ग्रुप जॉईन केला. मात्र थिएटरमध्ये पैसे मिळत नाहीत. रोजचा उदरनिर्वाह चालवणेसुद्धा शक्य होत नाही. एकवेळच्या जेवणाची तरी सोय व्हावी म्हणून मी वॉचमनची नोकरी स्वीकारली."

नवाज यांनी 1999 साली आलेल्या 'सरफरोश' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यानंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'ब्लॅक फ्रायडे', 'गँग्स ऑफ वासेपुर', 'बजरंगी भाईजान' यांसारख्या सिनेमांमध्ये झळकले आहेत.

 

कधीकाळी हॉटेलमध्ये भांडी धुवायचे काम करायचा अक्षय कुमार
अक्षय कुमारने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात भरपूर संघर्ष करुन यशोशिखर गाठले आहे. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अक्षयने हॉटेलमध्ये वेटरचेसुद्धा काम केले आहे. ज्या हॉटेलमध्ये अक्षय काम करायचा, तिथे त्याला कधी कधी भांडी धुवायचेही काम करावे लागायचे. अक्षयने 1991 मध्ये आलेल्या सौगंध या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर अक्षयने 'खिलाडी' (1992), 'वक्त हमारा है' (1993), 'धडकन' (2000), 'अंदाज' (2003), 'राउडी राठौर' (2012), 'रुस्तम' (2016) यांसह अनेक सिनेमांत काम केलंय.

 

एक नजर टाकुया, अशाच आणखी काही बॉलिवूड स्टार्सवर जे सिनेसृष्टीत येण्यापूर्वी वेगळे आयुष्य जगले...

बातम्या आणखी आहेत...