आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 37 व्या वर्षी अविवाहित आहे नेहा धुपिया, तीन अफेअर्सनंतरही होऊ शकले नाही लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड जेम्स सिल्वेस्टर आणि युवराज सिंगसोबत नेहा धुपिया - Divya Marathi
बॉयफ्रेंड जेम्स सिल्वेस्टर आणि युवराज सिंगसोबत नेहा धुपिया

मुंबई: अभिनेत्री नेहा धूपिया अलीकडेच 63 व्या फिल्मफेअर अवॉर्ड 2018 या इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी तिने यलो कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. 'हिन्दी मीडियम', 'तुम्हारी सुलू' या चित्रपटांमध्ये झळकलेली नेहा वयाच्या 37 वर्षी अविवाहित आहेत. पण तिच्या अफेअर्सचे किस्से चांगलेच गाजले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला नेहाच्या अफेअर्सविषयीची माहिती देत आहोत. 

 

स्क्वॅश प्लेअर होता नेहाचे पहिले प्रेम..
- 'कयामत' फेम नेहा धूपियाचे पहिले प्रेम नॅशनल लेवल स्क्वॅश प्लेअर ऋत्विक भट्टाचार्य होते. 
- नेहाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा तिने काही निवडक जाहिराती केल्या होत्या, त्या काळात तिची भेट ऋत्विकसोबत झाली होती. ही गोष्ट 2000 मधील आहे. या काळात दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले होते. 
- नेहा-ऋत्विक तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघे लग्न करणार असल्याचीही त्यावेळी चर्चा होती.
- पण लग्नाची बातमी केवळ चर्चेपुरतीच मर्यादीत राहिली. 2010 मध्ये हे कपल विभक्त झाले. त्यानंतर एका मुलाखतीत नेहाने ती सिंगल असल्याचे स्पष्ट केले होते.
- ऋत्विक 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोचा रनरअप ठरला होता. पिया त्रिवेदी या तरुणीसोबत ऋत्विकचे लग्न झाले आहे.


युवराज सिंगसोबत जुळले होते नेहाचे नाव
- 2014 मध्ये नेहाचे नाव क्रिकेटर युवराज सिंहसोबत जुळले होते.
- अॅक्टर-सिंगर सोफी चौधरीच्या बर्थडे पार्टीत नेहा आणि युवराज यांना एकत्र बघितले गेले होते.
- या पार्टीनंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या आल्या होत्या. पण नेहाने युवराजसोबत रिलेशनशिपमध्ये नसल्याचे म्हटले होते.
- या अफवांच्या काही महिन्यांनी युवराजने हेजल कीचसोबत साखरपुडा केला होता.


डेंटिस्टसोबतही होते अफेअर
- युवराजनंतर नेहाचे नाव जेम्स सिलवेस्टर नावाच्या तरुणासोबत जुळले होते. रिपोर्टनुसार, जेम्स मुळचा यूएसचा असून व्यवसायाने डेंटिस्ट आहे. विशेष म्हणजे जेम्स नेहामुळे मुंबईत स्थायिक झाला होता.
- नेहा त्याला प्रेमाने जिमी म्हणून हाक मारायची. काही काळाने हे कपल विभक्त झाले.
- नेहाने एका मुलाखतीत तिच्या या ब्रेकअपविषयी सांगितले होते, "होय, जिमी आता वॉशिंग्टनला शिफ्ट झाला आहे. मी माझ्या पर्सनल लाइफविषयी आणखी काहीही बोलू इच्छित नाही." 
- वॉशिंग्टनला गेल्यानंतर काही काळ नेहा आणि जेम्स लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होते. पण अखेर दोघे वेगळे झाले.


पुढील स्लाईड्सवर बघा, नेहाचे तिच्या एक्स बॉयफ्रेंड्ससोबतचे PHOTOS...