आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरचा नेहा-अंगदचा पहिला फोटो, लाल चुडा घालून पोज देताना दिसली नववधू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नवविवाहित दाम्पत्य नेहा धुपिया आणि अंगद बेदी सध्या यूएसमध्ये आहेत. लग्नानंतर लगेचेच हे दोघे यूएसला रवाना झाले होते. दोघांचा लग्नानंतरचे  खास फोटो समोर आले आहेत. यामध्ये अंगद ब्लॅक कोर्ट-पँटमध्ये तर नेहा गोल्ड फ्लोवी इव्हनिंग गाऊनमध्ये दिसतेय. नववधू नेहाच्या हातात लाल चुडाही दिसतोय. नेहाचा हा ड्रेस शंतनू आणि निखिल यांनी डिझाइन केला आहे. तर अंगदचा आउटफिट राघवेंद्र राठौर यांनी डिझाइन केला. 10 मे रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारात नेहा आणि अंगद यांनी गुपचुप लग्न उरकले. त्यानंतर काही प्रोफेशनल कमिटमेंट्ससाठी दोघे अमेरिकेला रवाना झाले. येथे हे दोघे पाच ते सहा दिवस वास्तव्याला असतील. 

 

अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे नेहा... 
- नेहा धूपियाचे  वय 37 वर्षे आहे. तर तिचा नवरा आणि अभिनेता अंगद तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. अंगदचे वय 35 वर्षे आहे. 
- अमेरिकेतील फोटोज पोस्ट करुन नेहाने हे  स्पष्ट केले, की ती येथे हनीमूनसाठी नव्हे तर कामाच्या निमित्ताने आली आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...