आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नील नितिन मुकेशसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज नील आणि त्याची पत्नी रुक्मिणी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्यावर्षी म्हणजे 9 फेब्रुवारी 2017 रोजी उदयपूर येथे नील-रुक्मिणी शाही थाटात लग्नाच्या बेडीत अडकले होते. डोळे दिपवणारा असा दोघांचा लग्नसोहळा होता. उदयपूरमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये रजवाडापध्दतीने मोठ्या थाटामाटात हा विवाहसमांरभ पार पडला होता. लग्नात नील मरुन रंगाच्या शेरवानीमध्ये तर रुक्मिणी लाल रंगाच्या लहेंग्यात खूप सुंदर दिसली होती. फोटोमध्ये नीलचे वडील नितीन मुकेश त्यांच्या सुनबाईंसोबत अत्यंत आनंदात दिसले. काही फोटोत ते आपल्या सुनेचा पदर सावरत आहेत तर काहीमध्ये रुक्मिणीला फ्लाईंग किस देताना दिसले होते.
लग्नापूर्वी झाली होती कॉकटेल पार्टी, फेअरिटेल एन्गेजमेंट
संगीत आणि मेंदी सेरेमनीपूर्वी कॉकटेल पार्टी आणि फेअरिटेल एन्गेजमेंटचे आयोजन करण्यात आले होते. कॉकटेल पार्टीत नील थ्री पीस सूटमध्ये तर रुक्मणीने फुल लेन्थ गाऊन कॅरी केला होता. तर एन्गेजमेंटसाठी फेअरिटेल ही थीम ठेवण्यात आली होती. साखरपुड्यासाठी खास ड्रेसकोडही ठेवण्यात आला होता. नीलच्या फेअरिटेल एन्गेजमेंटमध्ये पुरुष टक्सेडो आणि महिलांनी गाऊन परिधान केला होता. सेलिब्रिटी डीजे सुकेतूच्या तालावर पाहुण्यांनी ताल धरला होता.
लग्नात झाली होती पुष्पवृष्टी...
कॉकटेल आणि फेअरिटेल एन्गेजमेंटनंतर नील आणि रुक्मिणी यांची संगीत, हळदी आणि मेंदी सेरेमनी झाली होती. या लग्नात 500 गेस्ट सहभागी झाले होते. नीलच्या या ग्रॅण्ड वेडिंगमध्ये हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती. शिवाय लग्नाची वरात खास विंटेज गाड्यांमधून लग्नमंडपात पोहोचली होती. लग्नात अभिषेक बच्चन, रणबीर कपूर आणि त्यांचे कुटुंबिय शिवाय हृतिक रोशन, कतरिना कैफ, जॉन अब्राहम सहभागी झाले होते.
नील-रुक्मिणीचे होते अरेंज मॅरेज
35 वर्षीय नील आणि 28 वर्षीय रुक्मिणी यांचे अरेंज मॅरेज असून दोन्ही कुटुंबिय एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. 2015 मध्ये दस-याच्या शुभमुहूर्तावर दोघांचा साखरपुडा झाला होता.
कोण आहे रुक्मिणी सहाय...
रुक्मिणी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आहे. तिचे शिक्षण मुंबईतील लीलावती बाई पोदार हायस्कूलमधून झाले आहे. सध्या ती ACASS रिक्रूटमेंट कंपनीत काम करते.
या फिल्म्समध्ये दिसला नील...
'जॉनी गद्दार', 'न्यूयॉर्क', 'सात खून माफ', 'वझीर', 'प्रेम रतन धन पायो' यांसह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे.
नील आणि रुक्मिणी यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची खास झलक...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.