आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • नील नीतिन मुकेश, Neil Nitin Mukesh Rukmini Sahay Are Expecting Their First Child

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहिद कपूरनंतर आता हा अभिनेता होणार आहे बाबा, वर्षभरापूर्वीच झाले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरनंतर आता नील नीतिन मुकेश बाबा होणार आहे. नीलची पत्नी रुकमणी सहाय हिच्याकडे गोड बातमी असून हे या दाम्पत्याचे पहिले अपत्य असेल. ही आनंदाची बातमी स्वतः नीलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन दिली. नीलने फोटो शेअर करुन लिहिले, 'Now we will be THREE 👶🏼'. सध्या नील अबू धाबी येथे त्याच्या आगामी 'साहो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नीलने सांगितले, की  'काही महिन्यांपूर्वीच आम्हाला ही गोड बातमी समजली. पण बातमी सार्वजनिक करण्यापूर्वी आम्ही सर्व गोष्टी सेटल होण्याकडे लक्ष दिले. अबू धाबीच्या मागच्या ट्रीपमध्ये आम्ही आमच्यासाठी शॉपिंग केली पण आता आमचे सगळे लक्ष आमच्या येणा-या बाळाकडे लागले आहे.'  गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नील आणि रुकमणी यांचे लग्न झाले होते.

 

अखेरचा 'गोलमाल अगेन'मध्ये झळकला होता नील... 

- नील नीतिन मुकेश अखेरचा 'गोलमाल अगेन' या चित्रपटात झळकला होता.
- 'सोहा' आणि 'फिकरी' हे त्याचे आगामी चित्रपट आहे. 
- नीलने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती. 'विजय' (1988) आणि 'जैसी करनी वैसी भरनी' (1989) या चित्रपटांमध्ये तो बालकलाकाराच्या रुपात झळकला होता.
- 'जॉनी गद्दार' (2007), 'लफंगे परिंदे' (2010), 'तेरा क्या होगा जॉनी' (2010), 'प्लेयर्स' (2012), 'प्रेम रतन धन पायो' (2015) सह अनेक चित्रपटांमध्ये नील झळकला. पण त्याचे अॅक्टिंग करिअर फारसे यशस्वी ठरलेले नाही.
- नीलचे वडील नीतिन प्रसिद्ध गायक आहेत. तर आजोबा मुकेश हेदेखील प्रसिद्ध गायक होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, नील आणि रुकमणी यांचे खास Photos... 

बातम्या आणखी आहेत...