आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी रजनीकांतपेक्षा दुप्पट फीस घ्यायच्या श्रीदेवी, 13 व्या साकारली आईची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच हुरहूर लागली आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रीदेवी यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. गेल्यावर्षीच त्यांनी सिनेसृष्टीतील 50 वर्ष पुर्ण केली होती. 'मॉम' हा त्यांचा शेटवचा चित्रपट ठरला. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 300 सिनेमे केले. हिंदी सिनेसृष्टीच्या या सुपरस्टारने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. प्रत्येक चित्रपटात त्यांची एक वेगळीच भूमिका दिसून यायची. तामिळ चित्रपट 'मूंदरु मुडिचू' मध्ये श्रीदेवी यांना रजनीकांतपेक्षा दुप्पट पैसे मिळाले होते.

 

 

रजनीकांतपेक्षा दुप्पट फीस
- काही वर्षांपुर्वी श्रीदेवी तामिळचा रीमे 'कौन बनेगा करोडपति' मध्ये सहभागी झाली होती. यावेळी शोचे होस्ट आणि अभिनेते प्रकाश राजने श्रीदेवीला त्यांच्या आयुष्यासंबंधीत काही प्रश्न विचारले होते.
- या शोमध्ये श्रीदेवीने आपल्या फीसविषयी सांगितले होते. 1976 मध्ये 'मूंदरु मुडिचू' साठी मला 5 हजार रुपये मिळाले असे त्यांनी सांगितले होते. तर या चित्रपटात काम करण्यासाठी रजनीकांत त्यांना 2000 रुपये देण्यात आले होते. 
- या चित्रपटासाठी कमल हासन यांना 30 हजार रुपये मिळाले होते. श्रीदेवीने सांगितले होते की, रजनीकांतला माझी आई मुलाप्रमाणे मानत होती.
- श्रीदेवींनी सांगितले होते की, आम्ही एकदा सर्व बसून बोलत होतो. तेव्हा रजनीकांत यांनी माझ्या आईला विचारले की - मी कमल हासनसारखा मोठा स्टार केव्हा बनेल. तेव्हा माझी आई म्हणाली होती की, तु एक दिवस नक्कीच मोठा स्टार बनशील.

 

 

13 वर्षांनी मोठ्या रजनीकांतची आई झाली होती श्रीदेवी...

तामिळ सिनेमा ‘मूंडरू मुडिचू’ (१९७६) मध्ये श्रीदेवी यांनी रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी श्रीदेवीचे वय फक्त 13 वर्ष होते तर रजनीकांत यांचे वय 26 वर्ष होते. श्रीदेवीने फक्त दाक्षिणात्य सिनेमांमध्येच रजनीकांत यांच्यासोबत काम केले असे नाही तर अनेक हिंदी सिनेमांमध्येही ते एकत्र दिसले होते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, एका सीनमध्ये चक्क रजनीकांतवर थुंकली होती श्रीदेवी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...