आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Toilet Overflow Scene In Sanju CBFC Cuts That Before Release 3 More Complains On Film

CBFCने काढून टाकला टॉयलेटचा सीन, तीन दृश्यांवर आक्षेप, 'संजू'वर संजयच्या वादग्रस्त आयुष्याचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेला संजू हा चित्रपट रिलीजपूर्वी वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने एका लिखित तक्रारीवरुन चौकशी करत चित्रपटातील तुरुंगातील टॉयलेटचा सीन चित्रपटातून काढून टाकला आहे. यापूर्वीही संजू या चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप नोंदवला गेला आहेत. या चित्रपटात संजयला असलेली बंदुकींची आवड, को-स्टार्ससोबतचे रिलेशन, माधुरी दीक्षित आणि अंडरवर्ल्डवरील नात्याचा खुलासा होणार नाहीये.


तक्रारीनंतर हटवण्यात आला सीन...
एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार,  ‘संजू’च्या ट्रेलरमध्ये  बैरकचे टॉयलेट ओवरफ्लो झाल्याच्या दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. आरटीआय अॅक्टिविस्ट पृथ्वी मस्के यांनी सीबीएफसीला पत्र लिहून चित्रपटातील तुरुंगातील दृश्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याची तक्रार केली होती.
- मस्के यांच्या तक्रारीनंतर सीबीएफसीने ते दृश्य चित्रपटातून वगळून टाकले आहे. 

 

यासाठी ठेवले ओवरफ्लोचे दृश्य...
राजकुमार हिराणी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की 1993 साली जेव्हा संजय तुरुंगात गेला होता, त्यावेळी मान्सून होते. एकेदिवशी दिवसभर पाऊस पडला होता. त्यामुळे संजयच्या सेलचे टॉयलेट ओवरफ्लो झाले होते. 

 

महिला आयोगात तक्रार 
'संजू' या चित्रपटातील एका संवादावरुन रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते गौरव गुलाटी यांच्या मते, चित्रपटातील एका दृश्यात सेक्स वर्कर्सविरोधात अपमानजनक शब्दांचा वापर केला गेला आहे.
- या दृश्यात अनुष्का रणबीरला विचारते, "तुझ्या पत्नीव्यतिरिक्त आणखी किती स्त्रियांसोबत तू शय्यासोबत केली आहे?" रणबीर म्हणतो प्रॉस्टिट्यूट (सेक्स वर्कर) ला वगळले तर 308 आठवतात.  चला सेफ्टीसाठी 350 लिहून टाक."

 

संवादावर आक्षेप..
तक्रारकर्त्याने चित्रपटातील  विक्की कौशलच्या संवादावरही आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटाती विक्कीने संजयचा गुजराती मित्र परेश घेलानीची भूमिका साकारली असून त्याच्या तोंडी 'घी छे तो घपाघप छे' हा संवाद आहे.
-ट्रेलरमध्ये रणबीर आणि विक्की यांचे एक दृश्य आहे. त्यामध्ये विक्की रणबीरला म्हणतो- "हमारे गांव में एक कहावत है। घी छे तो घपाघप छे। घी मतलब पैसा और घपाघप मतलब सेक्स।"

 

एक्स्ट्रा शॉट्स
- चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी आक्षेप घेतला.  त्यानंतर राजकुमार हिराणी यांनी क्लायमॅक्समध्ये बदल केला होता.

बातम्या आणखी आहेत...