आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Only Shahid Kapoor These Bollywood Celebs Also Married Outside The Film Industry

15 Actors: शाहिदच नव्हे हे अॅक्टर्ससुद्धा पडले सामान्य तरुणींच्या प्रेमात, बांधली साताजन्माची गाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रेम कोणत्याही वयात कुणाशीही होऊ शकते. प्रेमाला अटी किंवा बंधन नाहीये. श्रीमंत असो वा गरीब, सेलिब्रिटी असो सामान्य, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रेमाच्या बाबतीत बॉलिवूडविषयी बोलायचे झाले तर अनेक तरुणी अशा आहेत, ज्यांनी सेलिब्रिटी अभिनेत्यांनी मन जिंकून संसार थाटला. यातील अनेक तरुणींनींचा बॉलिवूडशी दूर-दूरपर्यंत संबंध नाहीये.


अभिनेता शाहिद कपूर आज आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करतोय. 7 जुलै 2015 रोजी मीरा राजपूतसोबत शाहिदने लग्नगाठ बांधली होती. खरं तर एकेकाळी शाहिदचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होते, मात्र त्याने लाइमलाइटपासून दूर, बॉलिवूडशी काहीही संबंध नसलेल्या मीरासोबत विवाह केला. 


बॉलिवूडमध्ये शाहिद हा एकमेव असा अभिनेता नाहीये, ज्याने बॉलिवूडपासून चार हात लांब असलेल्या तरुणीशी विवाह केलाय. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. शाहरुख खान, श्रेयस तळपदेपासून ते फरदीन खान, इमरान हाश्मीपर्यंत अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींशी नव्हे तर ज्यांच्या सिनेसृष्टीशी काहीच संबंध नाही, अशा तरुणींशी साता जन्माची गाठ बांधली आहे. 


चला तर मग भेटुया या सेलिब्रिटींच्या पडद्यापासून दूर राहणा-या जोडीदारांना..  

बातम्या आणखी आहेत...