आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुलीच्या आईसोबत अरिजीतने थाटले दुसरे लग्न, वादासोबत आहे जुने नाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पॅडमॅन' या चित्रपटातील 'आज से तेरी...' हे गाणे रिलीजपूर्वीच गाजत आहे. हे गाणे प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने गायले आहे. अरिजीत सिंहला त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणे पसंत नाही. त्याचे दोनदा लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अरिजीतने एका मुलीच्या आईसोबत दुसरे लग्न थाटले. अरिजीतची दुसरी पत्नी कोयल  त्याची बालपणीची मैत्रीण आहे. 


सलमान खानसोबतचा वाद आला होता चव्हाट्यावर...
2016 साली अरिजीत सिंह आणि सलमान खान यांच्यात झालेला वाद चांगलाच रंगला होता. रिपोर्ट्नुसार, एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अरिजीत सलमानविषयी उलटसुलट बोलला होता. त्यामुळे सलमान त्याच्यावर चांगलाच चिडला होता. याचा परिणाम असा झाला, की सलमानने 'सुल्तान' या सिनेमाती अरिजीतने गायलेले ‘जग घूमेया..’ हे गाणे काढून टाकले आणि नंतर ते राहत फतेह अली खान यांच्याकडून गाऊन घेतले.


अरिजीतने मागितली होती सलमानची जाहिर माफी...
या वादाबद्दल अरिजीतने फेसबुक पोस्टद्वारे सलमानची माफी मागितली होती. तसेच ‘सुल्तान’मधील त्याने गायलेले ‘जग घूमेया..’ हे गाणे न गाळण्याची विनंती केली होती. पण सलमानने त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले होते. एका मुलाखतीदरम्यान अरिजीतला या संपूर्ण वादावर प्रश्न विचारला गेला होता. यावर हे प्रकरण माझ्यासाठी संपलेले आहे, असे अरिजीतने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. काही घडले आणि सलमान माझ्यावर नाराज झाला. यानंतर मी त्याची माफीही मागितली. पण यामुळेही त्याची नाराजी दूर झाली नाही. आता म्हणून मी वारंवार माफी मागत राहू, असे होऊ शकत नाही. सलमानचा अनादर करण्याचा माझा उद्देश नव्हता आणि नाही. मी एकदा माफी मागितलेली आहे आणि त्यामुळेच माझ्या लेखी हे प्रकरण संपलेले आहे, असे तो म्हणाला होता.


ढील स्लाईड्सवर वाचा, अरिजीतच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...