आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padmawat 2nd Screeing: Ranbir Kapoor Deepika And Sanjay Leela Bhansali With High Security

\'पद्मावत\'च्या स्क्रिनिंगला दिसला दीपिकाचा Ex-BF रणबीर, कडक सुरक्षा व्यवस्थेत पोहोचले भन्साळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत' या चित्रपटाचे बुधवारी रात्री मुंबईत दुसरे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. भन्साळी कडक सुरक्षा व्यवस्थेत स्क्रिनिंगस्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत कारमध्ये पोलिस गार्ड बसले होते. या स्क्रिनिंगला दीपिकासुद्धा उपस्थित होती. पारंपरिक साडीत ती अतिशय सुंदर दिसली. 
 
रणवीरची दांडी, रणबीरची हजेरी... 
- 'पद्मावत'च्या दुस-या स्क्रिनिंगला रणवीर सिंहने दांडी मारली होती. तर याउलट दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर मात्र यावेळी आवर्जुन पोहोचला.
- रणबीरसह आलिया भटसुद्धा हा चित्रपट बघायला पोहोचली होती. रणबीर आणि आलिया आगामी ड्रॅगन या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
 
बॉयफ्रेंडसोबत पोहोचली नेहा कक्कड...
- गायिका नेहा कक्कडने बॉयफ्रेंड हिमाश कोहलीसोबत स्क्रिनिंगला उपस्थिती लावली.
- दोघेही फोटोग्राफर्सना एकत्र पोज देताना दिसली. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 
- स्क्रिनिंग अभिनेता विवेक ओबरॉय पत्नी प्रियांकासोबत पोहोचला. याशिवाय अंकिता लोखंडे, पत्नी रुक्मिणीसोबत नील नितिन मुकेश, सोनू सूद, मधू चोप्रा, मनोज जोशी या सेलिब्रिटींनीही स्क्रिनिंगला उपस्थिती लावून हा चित्रपट बघितला.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...