आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टिंग सोडून जॉब करत आहेत 90's ची ही अभिनेत्री, समोर आले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90's चा चित्रपट 'पापा कहते है' ची अभिनेत्री मयूरी कांगो दिर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. ती शेवटच्या वेळी 'वामसी' या तेलगू चित्रपटात झळकली होती. यानंतर ती बॉलिवूडच्या पार्टी किंवा फंक्शनमध्ये दिसली नाही. सध्या मयूरी फिल्मसोडून जॉब करत आहे. ती सध्या गुडगावच्या एका कंपनीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आहे. चित्रपट झाले फ्लॉप तर केले लग्न...
- 1995 मध्ये मयूरीने 'नसीम' या चित्रपटातून डेब्यू केला. 'पापा कहते है' आणि 'होगी प्यार की जीत' सारख्या चित्रपटानंतर तिचे कोणतेच चित्रपट चालले नाही.


- यानंतर 2000 मध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली आणि नरगिस (2000), थोड़ा गम थोड़ी खुशी (2001), डॉलर बाबू (2001) और किट्टी पार्टी (2002) सारख्या सीरियल्समध्ये काम केले. परंतू यामध्ये तिला अपेक्षित यश मिळाले नाही. 
- चित्रपट आणि सीरयलमध्ये यश न मिळाल्यानंतर मयूरीने डिसेंबर 2003 मध्ये एनआरआय आदित्य ढिल्लनसोबत औरंगाबादमध्ये लग्न केले. मयूरी आणि आदित्यची पहिली भेट कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एका पार्टीमध्ये झाली होती.

 

लग्नानंतर अमेरिकेतून केले MBA
- यानंतर मयूरी नव-यासोबत अमेरिकेत शिफ्ट झाली. येथे तिने मार्केटिंग आणि फायनेन्समध्ये एमबीए केले. नंतर 2004 ते 2012 पर्यंत अमेरिकेतच जॉब केला.
- 2011 मध्ये मयूरी आई बनली. तिला 6 वर्षांचा एक मुलगा आहे त्याचे नाव कियान आहे.
- मयूरी 2013 मध्ये भारतात शिफ्ट झाली. कारण तिचे सासूसासरे इकटेच राहतात आणि यामुळे तिचा मुलगाही त्यांच्या जवळ राहू शकतो.

 

ग्लॅमरस लाइफ आवडत नाही
इंडस्ट्रीमध्ये येण्याविषयी मयूरी म्हणाली की, मला ग्लॅमरस लाइफ आवडत नाही. यामुळे मी आयुष्याच्या त्या भागाला विसरले आहे. मी आता फक्त माझ्या कामावर प्रेम करते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, मयूरी जेव्हा 12 वीत होती, तेव्हाच मिळाला चित्रपटांमधून ब्रेक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...