आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणीतीने बिनधास्तपणे दाखवले स्ट्रेच मार्क्स, या बॉलिवूड अॅक्ट्रेससुद्धा बाळगत नाहीत लाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिणीती चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि नेहमी आपले फोटोदेखील पोस्ट करते. नुकताच तिने आपला एक फोटो शेअर केला असून त्यात तिचे पोट दिसत आहे. या फोटोत तिच्या पोटावर काही स्ट्रेच मार्क्सही दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकीकडे तिला ट्रोल केले जात आहे तर दुसरीकडे काहींनी तिला स्ट्रेच मार्क्स दाखवल्याबद्दल शूर म्हणत लग्नाचे प्रस्तावही पाठवले आहेत. एका यूजरने लिहिले की, मला परीसारखी मुलगी पाहिजे. दुसऱ्याने लिहिले, रियल बॉडी दाखवण्यासाठी परी तुझे आभारी आहोत. तथापि, काही दिवसांपूर्वी आपल्या वजनाबाबत प्रकाशझोतात राहणाऱ्या परिणीतीने तिचे वजनही कमी केले आहे. 

 

परिणीतीच नव्हे या अभिनेत्रीही कॉन्फीडेंटली दाखवतात स्ट्रेच मार्क्स... 
सिनेसृष्टीतील टफ कॉम्पिटीशन आणि कथेच्या मागणीनुसार निर्माते-दिग्दर्शक कलाकारांना कधी वजन कमी करायला लावतात, तर कधी ते वाढवायला सांगतात. जर अभिनेत्रींविषयी बोलायचे झाल्यास, त्यांना वजन कमीजास्त करण्यासोबतच गर्भावस्थेतूनही जावे लागते. या कारणांमुळे अभिनेत्रींच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. कधी पोटावर तर कधी हातांवर दिसणारे हे स्ट्रेच मार्क्स दिसू नये, असेच सर्वांना वाटत असते. पण बॉलिवूड अभिनेत्री हे स्ट्रेच मार्क्ससुद्धा कॉन्फीडेंटली दाखवताना दिसतात.


जाणून घेऊयात या अभिनेत्रींविषयी पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...