आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी सिनेसृष्टीत 80 च्या दशकात अशा अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली, ज्यांनी केवळ स्वतःची वेगळी स्टाइल स्टेटमेंटच निर्माण केली नाही, तर अभिनेत्रींची स्टाइलसुद्धा बदलली. आम्ही बोलतोय ते गतकाळातील ग्लॅमरस गर्ल परवीन बाबी हिच्याविषयी. तिची आज 13 पुण्यतिथी आहे. मुंबईतील राहत्या घरात ती मृतावस्थेत आढळून आली होती. रुपेरी पडद्यावर आपल्या खोडकर अंदाजासाठी ओळखल्या जाणा-या या बोल्ड अभिनेत्रीचे आयुष्य कॅमे-यासमोर जितके चांगले होते, तितकेच ख-या बेरंगी होते. परवीनच्या आयुष्यात दु:खांचे मोठे डोंगरच होते. परंतु महेश भट्ट यांच्यासोबत नाते तुटल्यानंतर तिच्या आयुष्यातील तणाव अधिकच वाढला. 20 जानेवारी 2005मध्ये दक्षिण मुंबईच्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळून आली होता. मृत्यूच्या दोन दिवसांनी ती जगात नसल्याचे सर्वांना कळले होते.
तीन अफेअरनंतरदेखील लग्न करु शकली नव्हती परवीन बाबी...
परवीनने अल्पावधीतच स्वतःला इंडस्ट्रीत प्रस्थापित केले. शिवाय याच काळात तिने जोडीदाराचाही शोध घेतला. सर्वप्रथम अभिनेता डॅनीसोबत तिचे नाव जुळले. 'धुएं की लकीर' या सिनेमापासून सुरु झालेले त्यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. डॅनीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कबीर बेदींची तिच्या आयुष्यात एन्ट्री झाली. कबीर नवीन विचारसरणीचे होते. सिगारेट, मद्यप्राशन करणा-या परवीनसोबत त्यांची मैत्री झाली. एकमेकांची साथ त्यांना भावली आणि त्यांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर महेश भट परवीनच्या आयुष्यात आले. जवळजवळ तीन वर्षे (1977-80) हे दोघे सोबत होते. मात्र त्यांचे नातेही लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. महेश भट यांचा विरह तिला अंधाराकडे घेऊन गेला.
पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या परवीनच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.