आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच मोडला होता 'आफरीन...' गर्लचा साखरपुडा, असे आहे खासगी आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: कोक स्टूडिओच्या 'आफरीन...' या गाजलेल्या गाण्यात राहत फतेह अली खान यांच्यासोबत झळकलेली पाकिस्तानी गायिका मोमिना मुस्तेहसनचा गेल्यावर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच साखरपुडा मोडला होता. स्वतः मोमिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा तुटला असल्याची घोषणा केली होती. दोन्ही कुटुंबीयांनी हा साखरपुडा तोडला असल्याचे तिने एका पोस्टमध्ये सांगितले होती. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात मोमिनाने यूएस बेस्ड बँकर अली नकवीसोबत साखरपुडा केला होता. 


मोमिना म्हणाली होती, आपल्या हातात काही नसतं...  
साखरपुडा मोडल्याची बातमी सांगताना मोमिनाने सोशल मीडियावर लिहिले होते, "आमच्या कुटुंबीयांनी हा साखरपुडा मोडला आहे. मी अपील करते, की हा आमचा खासगी निर्णय आहे, याविषयी कुणीही अफवा पसरवू नये. साखरपुडा तुटेल, हा विचार डोक्यात ठेऊन कुणीही साखरपुडा करत नसतं. आयुष्य सुरु राहतं.  आशा व्यक्त करते, अफवा पसरणार नाहीत. "


अरेंज्ड मॅरेज करणार होती मोमिना...  
- आफरीन.. या गाण्याने तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेल्या मोमिनाची गणना पाकिस्तानच्या मोस्ट ब्युटीफुल सिंगर्समध्ये होते. 
- मोमिनाने सोशल मीडियावर ती रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. 
- सप्टेंबर, 2016 मध्ये यूएस बेस्ड बँकर अली नकवीसोबत मोमिनाचा साखरपुडा झाला होता. मोमिनाचे हे अरेंज्ड मॅरेज होते. 


पुढे वाचा, कोण आहे मोमिना... 

बातम्या आणखी आहेत...