आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा भटपासून ते अक्षय खन्नापर्यंत, 21 वर्षांत एवढा बदलला 'बॉर्डर'च्या स्टारकास्टचा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. पूजाने अभिनयासोबतच निर्माती-दिग्दर्शिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजा भटने करिअरची सुरुवात 'डॅडी' या चित्रपटातून केली होती. त्यानंतर 1991 मध्ये आलेला आमिर खानसोबतचा 'दिल है कि मानता नहीं' हा चित्रपट तिच्या करिअरचा सुपरहिट चित्रपट ठरला. पूजा भटने 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' या अविस्मरणीय चित्रपटात कमला ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही भूमिका गाजली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत तिच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे.

 

'बॉर्डर' या चित्रपटाच्या रिलीजला 21 वर्षांचा काळ लोटला आहे. एवढ्या वर्षांत पूजासह चित्रपटातील सर्वच कलाकारांचा लूक बराच बदलला आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला पूजा भटसह सुनील शेट्टी, सनी देओल, तब्बू, जॅकी श्रॉफ, पुनीत इस्सर, सुदेश बेरीसह चित्रपटातील इतर स्टारकास्टचा लेटेस्ट लूक दाखवत आहोत. 

 

 'बॉर्डर'ने कमावले होते 40 कोटी...
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'बॉर्डर' हा चित्रपट 13 जून, 1997 रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. 10 कोटींच्या निर्मिती खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने त्याकाळा 39.5 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाला मिळालेली प्रचंड लोकप्रियता बघून दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी 'बॉर्डर' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, 21 वर्षांत किती बदलला 'बॉर्डर'च्या स्टारकास्टचा लूक...

बातम्या आणखी आहेत...