आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न स्टार्सविषयी अभिनेत्रीने केले असे ट्वीट, वादंग उठल्यानंतर करावे लागले डिलीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबादः दाक्षिणात्य अभिनेत्री पूनम कौर हिने अलीकडेच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पूनमने एक वादग्रस्त ट्वीट करताना लिहिले, - भारतात पोर्न स्टारचे आयुष्य आणि अब्रू ही एका सामान्य तरुणीपेक्षा चांगली असते. या ट्वीटवरुन चांगलाच गदारोळ माजला. त्यामुळे पूनमला तिचे ट्वीट डिलीट करावे लागले. हैदराबाद येथे जन्मलेल्या पूनमने 13 हून अधिक तेलुगु चित्रपटांत काम केले आहे. 'विनायकुडु' हा तिच्या बिगेस्ट हिट चित्रपटांपैकी एक आहे. 


अभिनेत्याने केले होते पोर्न स्टार मिया मलकोवाचे कौतुक...
- पूनम कौरचे हे ट्वीट म्हणजे अभिनेता कथी महेशच्या त्या गोष्टीचे उत्तर आहे, ज्यात त्याने पोर्न स्टार मिया मलकोवाचे कौतुक केले होते.
- कथीने ट्वीट करताना म्हटले होते, - मियाचे फिजिक, तिचा आवाज आणि एमएम कीरावनीचे बॅकग्राउंड म्युझिक 'गॉड सेक्स अँड ट्रुथ' या चित्रपटाला उत्कृष्ट बनवतो.    
- मिया मलकोवा लवकरच रामगोपाल वर्मांच्या आगामी 'गॉड सेक्स अँड ट्रुथ' या चित्रपटात झळकणार आहे. डाक्युमेंट्री बेस्ड या चित्रपटात मिया तिच्या सेक्स डिजायरविषयी बोलताना दिसतेय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, जेव्हा स्टार्सनी दिले असे कॉन्ट्रोव्हर्शिअल कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...