आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलीशा चिनॉयपासून बाबाबा सहगलपर्यंत, लाइमलाईटपासून दूर आहेत हे 90s पॉप गायक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 90 च्या दशकात असे अनेक पॉप गायक होते ज्यांनी पॉप गाण्यांची एक वेगळीच क्रेझ निर्माण केली. त्यात पॉप सिंगर अलीशा चिनॉय, बाबा सहगल, श्वेता शेट्टी, फाल्गुनी पाठक ही नावे तुम्हाला अजूनही लक्षात असतील पण हे सर्व गायक लाइमलाईटपासून दूर आहेत. अनेक वर्षांपासून या गायकांचे एकही गाणे समोर आलेले नाही. पण त्यांचे जुने गाणे आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जातात. 

 

'मेड इन इंडिया' गाण्याने प्रसिद्ध झाली होती अलिशा चिनॉय..

पॉप गायिका अलिशा चिनॉय आता 52 वर्षाची झाली आहे. मिलिंद सोमणसोबत केलेल्या मेड इन इंडिया या गाण्याने अलिशाला रातोरात स्टार बनविले होते. अलिशाचे नंतर अनेक म्यूजिक अल्बमही आले. त्यात 'शट अप एंड किस मी' (2007), 'अलीशा मैडोना' (1990), 'आह अलीशा' (2009) यांसारखे अनेक अल्बम आले. अलिशाने 'जूबी जूबी..' (फिल्म 'डांस डांस',1987), 'करते हैं हम प्यार मिस्टर इंडिया से..' (फिल्म 'मिस्टर इंडिया', 1987), 'रात भर जाम से जाम टकराएगा...' (फिल्म 'त्रिदेव', 1989), 'रुक, रुक रुक अरे बाबा...' (फिल्म 'विजयपथ', 1994), 'कजरारे कजरारे तेरे...' (फिल्म 'बंटी और बबली', 2005), 'आज की रात...' (फिल्म 'डॉन', 2006) यांसारखे अनेक सुपरहिट गाणे दिले. 2013 मध्ये आलेल्या क्रिश चित्रपटात अलिशाने शेवटचे गायले. 

 

पुढच्या 6 स्लाईडवर वाचा, लाइमलाईटपासून दूर आहेत हे 6 पॉप गायक 

बातम्या आणखी आहेत...