आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Post Sridevis Demise, Arjun Kapoor To Move In With Boney Kapoor,Janhvi And Khushi

एकेकाळी तोंड बघणेही करत नव्हता पसंत, आता सावत्र बहिणींसोबत राहणार अर्जुन कपूर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोनी कपूर यांनी 8 मार्च रोजी हरिद्वार येथे जाऊन श्रीदेवींच्या अस्थी विसर्जित केल्या. यावेळी बोनी कपूर अतिशय भावूक झाले होते. त्यांना त्यांचे धाकटे भाऊ अनिल कपूर यांनी यावेळी धीर दिला. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत श्रीदेवी यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर बोनी कपूर आणि मुली जान्हवी, खुशी यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. अशा प्रसंगी कलाविश्वापासून ते अगदी चाहत्यांपर्यंत सर्वांनीच त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुलं म्हणजेच, अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहिण अंशुलासुद्धा मागे नव्हते.

 

आता बोनी कपूर यांच्यासोबत राहणार अर्जुन कपूर... 
‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अर्जुन आपल्या वडिलांच्या घरीच स्थायिक होण्याच्या विचारात आहे. आतापर्यंत तो आणि अंशुला वडिलांपासून आणि सावत्र बहिणींपासून वेगळे राहात होते. पण, सध्याची परिस्थिती पाहता आपल्या वडिलांना आणि बहिणींना आधाराची गरज असल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. अर्जुन त्याच्या सख्ख्या बहिणीच्या म्हणजेच अंशुलाच्या बाबतीत जितका जबाबदारपणे वागतो, तितकीच त्याला जान्हवी आणि खुशीचीदेखील काळजी वाटत आहे. 

 

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या लग्नाच्या विरोधात होता अर्जुन... 
अर्जुनची आई मोना कपूरपासून वेगळे होऊन वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केले होते. या लग्नामुळे अर्जुनचे त्यांच्याविषयी फार चांगले मत नव्हतं. मात्र श्रीदेवी यांच्या मात्र अर्जुन आणि अंशुला या दोघांनीही आपली जबाबदारी ओळखत जान्हवी आणि खुशीला आधार देत त्यांचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यास हातभार लावला आहे. 

 

श्रीदेवी यांच्या पार्थिवाला दिला होता अर्जुनने खांदा...

श्रीदेवी यांच्यावर 28 फेब्रुवारी रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.  यावेळी त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन कपूरने त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता.  

बातम्या आणखी आहेत...