आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 63rd Jio Filmfare Awards 2018: Pregnant Preity Zinta Shah Rukh Khan And Other Celebs Inside Photos

Filmfare अवॉर्डमध्ये पोहोचली प्रेग्नेंट प्रीती!, रेखाने दिले विद्या बालनला नृत्याचे धडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शनिवारी मुंबईत 63 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. या अवॉर्ड सोहळ्याचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यामध्ये प्रीती झिंटा अभिनेत्री दीया मिर्झासोबत वेळ घालवताना दिसली. प्रीती झिंटा प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. प्रीतीने बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत पाच वर्षांच्या डेटिंगनंतर  29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजिलिस येथे लग्न केले होते. 


विद्याला डान्स शिकवताना दिसली रेखा...
- इव्हेंटमध्ये एव्हरग्रीन रेखाने उपस्थिती लावली होती. यावेळी रेखाने मंचावर विद्या बालनला नृत्याचे धडे दिले. 
- इतकेच नाही तर रेखा  परिणीती चोप्रासोबत सेल्फी क्लिक करताना दिसली.

अक्षयने दिला डान्स परफॉर्मन्स
- अवॉर्ड शोमध्ये अक्षय कुमारने डान्स परफॉर्मन्स दिला. तर राजकुमार रावसोबत आयुष्मान खुराणा मंचावर थिरकताना दिसला.
- फंक्शनमध्ये शाहरुख खान, काजोल, नेहा धूपिया, रणवीर सिंह, सोनम कपूर, पूजा हेगडे, अश्विनी अय्यर तिवारी, राजकुमार राव, रेखा, सोनाली बेंद्रे, माधुरी दीक्षित, अथिया शेट्टी, आलिया भट, सोनल चौहान, जया बच्चन, दीया मिर्झा, विद्या बालनसह अनेक सेलेब्स स्पॉट झाले.

 

बेस्ट अॅक्टर ठरला इरफान खान
- यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार 'हिंदी मीडियम' या चित्रपटाला मिळाला. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 
- 'तुम्हारी सुलु'साठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
- तर क्रिटिक्सने राजकुमार रावला 'ट्रॅप्ड'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडले.
- 'सीक्रेट सुपरस्टार'साठी जायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला.

 

यांनाही मिळाले अवॉर्ड
बेस्ट डायरेक्टर - अश्विनी अय्यर तिवारी (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट डेब्यू डायरेक्टर - कोंकणा सेन शर्मा (फिल्म ए डेथ इन द गुंज)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर राजकुमार राव (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- मेहर विज (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)
बेस्ट ओरिजन स्टोरी- अमित मसूरकर (फिल्म न्यूटन)
बेस्ट अॅक्टर मेल शॉर्ट फिल्म - जॅकी श्रॉफ (फिल्म खुजली)
बेस्ट अॅक्टर फीमेल शॉर्ट फिल्म- शैफाली शाह ( फिल्म जूस)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फेल- अरिजीत सिंह (फिल्म बद्रीनाथ की दुल्हनिया)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फीफेल- मेघना मिश्रा (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- बप्पी लहरी


पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड्स फंक्शनचे इनसाइड PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...