आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळा मारणा-या या तरुणीने Valentine's Dayला उघड केली स्वतःची लव्ह लाइफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती केवळ प्रिया प्रकाश वारियर या तरुणीची. अवघ्या २६ सेकंदांच्या व्हिडिओमुळे प्रिया इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. आगामी 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून प्रिया सिनेसृष्टीत पदार्पण करत असून या चित्रपटातील‘मणिक्या मलराया पूवी’ या गाण्याने ती प्रसिद्धीझोतात आली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून प्रियाचे हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं यूट्युबवर आतापर्यंत १ कोटी ४० लाखहून अधिक लोकांनी पाहिले आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रियाच्या फॉलोवर्समध्येही वाढ झाली आहे. सर्वात कमी कालावधीत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणारी प्रिया ही जगातील तिसरी सेलिब्रिटी ठरली आहे. प्रियाचे सध्या इन्स्टाग्रामवर ३० लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत.

 

प्रियाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक आहे. अलीकडेच तिने एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्ह लाइफचा उलगडा केला. प्रियाने सांगितले, की अद्याप तिला तिचा मिस्टर परफेक्शनिस्ट गवसलेला नाही.   


दिग्दर्शकाला हवे होते काहीतरी हटके....
इंटरेनटवर सर्वाधिक शेअर केल्या गेलेल्या त्या दृश्याबद्दल सांगताना प्रिया म्हणाली, की ती केवळ उत्फुर्त प्रतिक्रिया होती. हे दृश्य देशभरात वेगवेगळ्या सोशल मीडियावर इतके व्हायरल होईल याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. शाळेत दोघांमधले प्रेम, ते नाजूक क्षण मी अभिनयातून प्रभावीपणे साकारावे अशी दिग्दर्शकांची इच्छा होती. तू भुवया उडवून काहीतरी वेगळे करता आले तर बघ असे मला दिग्दर्शकांनी सांगितले होते, तेव्हा मी प्रयत्न करून पाहते इतकंच त्यांना सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रिकरण करताना मी ते उत्फुर्तपणे करून पाहिले हे दृश्य सगळ्यांना इतके आवडेल याचा विचारही त्याक्षणी मी केला नव्हता.


बॉलिवूडमध्ये करायचे आहे डेब्यू... 
या मुलाखतीत प्रियाने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, ‘मल्याळम, तामिळ आणि बॉलिवूड चित्रपटांच्या अनेक ऑफर्स मिळत आहेत. पण अद्याप मी कोणालाच होकार दिला नाही. बॉलिवूडमध्ये मी नक्कीच काम करेन. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.’


सर्वाधिक सर्च केली गेली प्रिया...
प्रियाची झलक असणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचे काही फोटो आणि मीम्सही व्हायरल झाले. इंटरनेटवर प्रिया सर्वाधिक सर्च केली गेली आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियाचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...