आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics : प्रियासोबत दिसणारा \'तो\' आहे तरी कोण! एका रात्रीतून आला लाइमलाइटमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोशल मीडियावर फक्त चर्चा आहे, ती ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्याची. या गाण्यातून प्रिया प्रकाश ही नवोदित अभिनेत्री एका रात्रीतून स्टार झाली आहे. तिच्या घायाळ करणा-या नजरेने तरुणाईच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. पण प्रियासोबतच आणखी एक नाव चर्चेत आले आहे. प्रियाच्या नजरेने घायाळ होताना दिसणारा 'तो' आहे तरी कोण? हे जाणून घेण्याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. प्रियासोबत दिसलेल्या या तरुणाचे नाव आहे रोशन अब्दुल रहुफ उर्फ मोहम्मद रोशन.


'उरु अदार लव्ह' आहे रोशनचा दुसरा चित्रपट...
'उरु अदार लव्ह' या चित्रपटातून प्रियासोबतच रोशनसुद्धा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या 3 मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होतोय. 


18 वर्षांचा आहे रोशन... 
रोशन आता 18 वर्षांचा असून आयसीएचा फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याने 'डी 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोचा तो फायनलिस्ट ठरला होता. अलीकडेच एका मुलाखतीत रोशन म्हणाला, 'हा माझा पहिला चित्रपट असून याविषयी मी अतिशय उत्साही आहे. मी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, यावर अद्याप माझा विश्वास बसत नाहीये. या चित्रपटात पाच हीरो-हीरोईन आहेत.


इंटरनेटवर आहे अॅक्टिव... 
रोशन खासगी आयुष्यात अतिशय विनोदी स्वभावाचा आहे. तो त्याचे फनी फोटोज नित्यनेमाने इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याने डेब्यू मुव्हीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेत. या फोटोत तो हवेत उडताना तर प्रिया त्याला बघताना दिसतेय. हा फोटो शेअर करुन रोशनने त्याला कॅप्शन दिले, 'Thank you all for your love and support'.


रोशनची इन्स्टाग्राम डायरी बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...     

बातम्या आणखी आहेत...