आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Property: प्रियांकापेक्षा जास्त श्रीमंत आहे बॉयफ्रेंड निक जोनास, एका शोसाठी घेतो 69 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची आघाडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनासच्या प्रेमात पडली आहे. पण हा निक जोनास कोण आहे? एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत त्याचे नाव किती आहे? हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊयात निकविषयी... निक हा आंतरराष्ट्रीय गायक आणि अभिनेता आहे. सेलिब्रिटी स्पीकर्स ब्युरोनुसार, निक जोनासची फीस 50 हजारांपासून ते 1 लाख डॉलरच्या घरात आहे. म्हणजेच तो एका शोसाठी 35 लाखांपासून ते 69 लाखांपर्यंत मानधन घेतो. 

 

निक जोनासचे हाइएस्ट सेलिंग अल्बम्स...

अल्बम    यूनिट
जोनास ब्रदर्स (2007) 20 लाख यूनिट
इट्स अबाउट टाइम (2007) 17.50 लाख यूनिट
निक जोनास (2014) 2.25 लाख यूनिट
लास्ट इयर वॉज काम्प्लीकेटेड (2016) 66 हजार यूनिट
 
प्रियांका आणि निक जोनासची संपत्ती 

प्रियांका आणि निक यांच्या संपत्तीविषयी बोलायचे झाल्यास, सेलिब्रिटी नेटवर्थ वेबसाइटनुसार,  निक जोनासजवळ प्रियांकापेक्षा अधिक संपत्ती आहे. प्रियांकांची संपत्ती 16 मिलियन डॉलर (110 कोटी रुपये) आहे. तर निक जोनासची नेटवर्थ 25 मिलियन डॉलर (172 कोटी रुपये) आहे. 

 

निकजवळ आहे हॉलिवूडमध्ये 25 कोटींचा  बंगला...
निक जोनासजवळ लॉस एंजिलिस (हॉलिवूड)  मध्ये 3175 स्वे. फूटमध्ये बनलेला एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 3.7 मिलियन डॉलर (25 कोटी रुपये)आहे. याशिवाय त्याच्याजवळ हॅम्पटन येथील एक बंगला आहे. 


निकचे  कार कलेक्शन...
निकजवळ Ford Mustang आहे. या कारची किंमत 45 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्या कार कलेक्शनमध्ये 24 लाख रुपये किंमतीची Chevy Camaro Convertible, 24 लाखांची Dodge Charger, 15 लाखांची Ford Thunderbird या कार आहेत. 

 

प्रियांकाजवळ 55 कोटींची रिअल इस्टेट प्रॉपर्टी...  
प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय तिची एंडोर्समेंट फीससुद्धा पाच कोटींच्या घरात आहे. प्रियांकाजवळ मुंबई आणि पुण्यात रिअल इस्टेट प्रॉपर्टी  असून त्याची किंमत 55 कोटी इतकी आहे. तर कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू, मर्सडीज आणि ऑडी या लग्झरी कार आहेत. तिच्या या आलिशान गाड्यांची एकुण किंमत चार कोटी आहे.  

 
प्रियांकाचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट   
चित्रपट कलेक्शन
कृष 3 (2013) 244 कोटी
अग्निपथ (2012) 115 कोटी
बर्फी (2012) 112 कोटी
डॉन 2 (2011) 106 कोटी 
        
 
 
 

बातम्या आणखी आहेत...