आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra And Nick Jonas Promise Ring Same To Same Ring : प्रियांका आणि निकच्या बोटात दिसल्या सारख्या अंगठ्या

Same To Same Ring : प्रियांका आणि निकच्या बोटात दिसल्या सारख्या अंगठ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा सध्या निक जोनाससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. अलीकडेच निक प्रियांकासोबत भारतात आला. दोघेही गेल्या आठवड्यात शुक्रवारी डिनर डेटवर गेले होते. वांद्रा येथील एका रेस्तराँमध्ये हे दोघे पोहोचले होते. येथून प्रियांका निकचा हात हातात पकडून बाहेर पडत असताना कॅमे-याच्या नजरा दोघांकडे वळल्या. यावेळी लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरली ती त्यांच्या हातातील अंगठ्या. प्रियांका आणि निक यांनी अगदी सारख्या अंगठ्या घातल्या होत्या. यावरुन दोघांनी प्री एंगेजमेंट केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे निक 25 वर्षांचा तर प्रियांका 35 वर्षांची असून दोघांत 10 वर्षांचे अंतर आहे. 

 

महिन्याभरात साखरपुडा करणार असल्याची चर्चा...  
फिल्मफेअर मॅगझिननुसार प्रियांकाने निक जोनाससोबत आपले नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांकाच्या जवळच्या सोर्सचा दाखला देऊन लिहिले आहे की, "जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये प्रियांका निक जोनाससोबत इंगेजमेंट करणार आहे. साखरपुडा फिक्स करण्यासाठीच प्रियांका जोनाला आपल्या कुटूंबीयांच्या भेटीसाठी भारतात घेऊन आली आहे." परंतू याविषयी काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत प्रियांका आणि निक...
- सध्या प्रियांका निकसोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. तिच्यासोबत भाऊ सिध्दार्थ आणि कजिन परिणीती चोप्राही गेली होती. आता परिणीती मुंबईमध्ये परतली आहे. 22 जूनला निक प्रियांकासोबत भारतात पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी प्रियांकाने जुहू येथील आपल्या प्लॅटमध्ये हाउसवार्मिंग पार्टीही दिली होती. यामध्ये आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रासोबतच तिचे अनेक फ्रेंड्स सहभागी होते.


कोण आहे नीक जोनास...
प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. निक हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. 8-9 वर्षांचा होता तेव्हापासून निक अभिनय करतोय. यादरम्यान अनेक नाटकांत त्याने अभिनय केला.2002 मध्ये निकने वडिलांसोबत मिळूल जॉय टू द वर्ल्ड नावाचे एक गाणे लिहिले आणि अशाप्रकारे निकने अभिनयाशिवाय संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. निकचे वडीलही एक गीतकार, गायक आणि रंगभूमी कलाकार होते. आई साईन लँग्वेजची टीचर होती़ सोबतच गायिका होती. वारसा निकला घरातूनच मिळाला होता. 2005मध्ये निकने पॉल केविन जोनास आणि जोसेफ एडम जोनास या दोन भावांसोबत जोनास ब्रदर्स नावाचा पॉप रॉक बँड बनवला. जोनास ब्रदर्सने चार अल्बम रिलीज केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...