आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंड निकच्या Ex-गर्लफ्रेंडला होतेय ईर्षा, म्हणाली- मी प्रियांकाशी स्पर्धा करु शकत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्रा (35) सध्या आपला फॉरेनर बॉयफ्रेंड निक जोनास (25) मुळे चर्चेत आहे. ती नेहमीच बॉयफ्रेंड निकसोबत डिनर डेटवर तर कधी फॅमिली फंक्शनमध्ये स्पॉट होत असते. तिच्या रिलेशनशीपमुळे तिचे चाहते आनंदी होत आहेत. तर यामुळे काही लोक नाराजही आहेत. निकची एक्स गर्लफ्रेंड डेल्टा ही दोघांच्या रिलेशनशीपमुळे खुप नाराज आहे. एका एन्टटेन्मेंट वेबसाइटनुसार डेल्टाच्या एका जवळच्या फ्रेंडने खुलासा केला की, निकला दूस-यासोबत पाहून तिला खुप ईर्षा होतेय. 


2011 मध्ये डेल्टासोबत रिलेशनशीपमध्ये होता निक...
- प्रियांकापुर्वी निक 2011 मध्ये अभिनेत्री-सिंगर डेल्टासोबत सीरिअस रिलेशनशीपमध्ये होता. परंतू 2012 मध्ये दोघांमध्ये दूरावा आला.
- डेल्टाच्या फ्रेंडने सांगितले की, आम्हाला वाटले होते की, काही काळानंतर निक आणि तिच्यामधील दूरावा संपेल. परंतू आता निकच्या आयुष्यात प्रियांका आल्यामुळे ती आशाही संपली आहे. 
- डेल्टानुसार, "मी प्रियांकासोबत स्पर्धा करु शकत नाही. तिच्याजवळ प्रिंस हॅरीची पत्नी, मेगल मार्कलसारखी मैत्रीण आहे."
- प्रियांका आणि निक वेळेनुसार एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. फादर्स डेच्या दिवशी तिने निकच्या वडिलांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करणे सुरु केले आहे.

 

प्रियांकापेक्षा 10 वर्षे लहान आहे निक
- 'क्वांटिको' टीव्ही शो दरम्यान प्रियांकाची भेट 10 वर्षीय अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत झाली. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून यांची भेट झाली.
- डेटिंगच्या बातम्यानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रियांका आणि निक एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसले.
- प्रियांका आणि निक दोघांमधून कुणीही त्यांच्या रिलेशनशीपचा खुलासा केलेला नाही. परंतू यूएस डेलीच्या वृत्तानुसार दोघांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या नात्याचा खुलासा केला आहे. 
- सूत्रांनी सांगितले होते की, "हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत आणि हे खुप नवीन आहे. हे एक चांगले मॅच आहे आणि दोघंही एकमेकांमध्ये खुप इंटरेस्टेड आहेत."
- निकच्या कजिनचे लग्न अटलांटिक सिटीत झाले. यावेळी प्रियांकाही सहभागी झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...