आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day Spl : प्रियांकाचे बालपणीचे हे Unseen फोटोज बघायला विसरु नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज (18 जुलै) आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियांकाने आपल्या करिअरमध्ये अनेक पाय-या चढत हे यशोशिखर गाठले आहे. प्रियांकाने भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे स्वतःचे नाव उंचावले आहे. इंटरनॅशनल आयकॉन म्हणून ओळखल्या जाणा-या प्रियांकाच्या बालपणीच्या फोटोजचे खास कलेक्शन आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


प्रियांकाचा जन्म 18 जुलै, 1982 रोजी जमशेदपूर येथे झाला. पण ती बरेलीला स्वतःचे होम टाऊन समजते. पालकांच्या नोकरीमुळे प्रियांकाचे बालपण जमशेदपूरशिवाय दिल्ली, पुणे, लखनऊ, बरेली, लद्दाख, चंडीगढ आणि अंबाला येथे गेले. यावेळी तिने लखनऊ (ला मार्टिनिअर गर्ल्स स्कूल) आणि बरेली (सेंट मारिया गोरेट्टी कॉलेज) मधून तिने शिक्षण घेतले. वयाच्या 13व्या वर्षी ती शिक्षणासाठी यूनायटेड स्टेटला निघून गेली. तीन वर्षांनी परत आलेल्यानंतर आर्मी स्कूलमधून हायस्कूलची परिक्षा दिली. 2000 मध्ये प्रियांकाने मिस इंडिया पेजेंटमध्ये सहभाग घेतला आणि किताब जिंकला. याचवर्षी तिला भारताकडून मिस वर्ल्ड पेजेंटमध्ये पाठवण्यात आले होते आणि हा ताजदेखील तिने आपल्या डोक्यावर सजवला.

 

'बेवॉच'द्वारे तिची हॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. 'बेवॉच'नंतर आता प्रियांकाने दोन हॉलिवूड चित्रपट साइन केले आहेत. 'ए किड लाइक जेक' आणि 'इजंट इट रोमांटिक' हे तिचे आगामी हॉलिवूड चित्रपट आहेत.  तर बॉलिवूडमध्ये तिने अलीकडेच अली अब्बास जफर यांचा एक चित्रपट साइन केला असून यात सलमान खान तिचा हीरो असेल. 'भारत' हे या चित्रपटाचे शीर्षक आहे. 


प्रियांका सध्या अमेरिकेत असून निक जोनास या अमेरिकन गायकासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचेही म्हटले जात आहे. सोशल मीडियावर निकसोबतची प्रियांकाची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत.  


पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियांकाचे बालपण खास छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...