आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: एकेकाळी प्रियांका टॉयलेटमध्ये लपून खायची चिप्स, तीनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज अभिनेत्री प्रियांका चोप्रा 36 वर्षांची झाली आहे. 18 जुलै 1982 रोजी तिचा जन्म जमशेदपूर, बिहार येथे झाला. तिचे दिवंगत वडील आकाश चोप्रा आणि मधु चोप्रा आर्मीचे फिजिशिअन होते. पालकांच्या नोकरीमुळे प्रियांकाचे बालपण जमशेदपूरशिवाय दिल्ली, पुणे, लखनऊ, बरेली, लद्दाख, चंडीगढ आणि अंबाला येथे गेले. यावेळी तिने लखनऊ (ला मार्टिनिअर गर्ल्स स्कूल) आणि बरेली (सेंट मारिया गोरेट्टी कॉलेज) मधून तिने शिक्षण घेतले. वयाच्या 13व्या वर्षी ती शिक्षणासाठी यूनायटेड स्टेटला निघून गेली. तीन वर्षांनी परत आलेल्यानंतर आर्मी स्कूलमधून हायस्कूलची परिक्षा दिली. 2000मध्ये प्रियांकाने मिस इंडिया पेजेंटमध्ये सहभाग घेतला आणि किताब जिंकला. याचवर्षी तिला भारताकडून मिस वर्ल्ड पेजेंटमध्ये पाठवण्यात आले होते आणि हा ताजदेखील तिने आपल्या डोक्यावर सजवला.


प्रियांकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, तिच्याशी निगडीत अशा काही खास गोष्टी ज्या जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल.

 

सावळ्या रंगामुळे व्हायची टीका 
प्रियांकाला बालपणी सर्वजण 'काली-कलूटी' म्हणून चिडवत होते. परंतु आज तीच सावळी तरुणी जगात आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. बालपणी प्रियांका खूप सावळी होती म्हणून तिला सर्वजण चिडवत होते. आज प्रियांकाची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. पण तिला तिच्या आई-वडिलांचा पाठिंबा मिळाला नसता तर ती आज इंडस्ट्रीमध्ये येऊच शकली नसती.

 

टॉयलेटमध्ये बसून खायची चिप्स 
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा अर्थातच पीसी 13 वर्षांची असताना बोस्टनला शिक्षण घेण्यासाठी गेली होती. या अनुभवाविषयी प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले होते, 'वयाच्या जवळपास 13व्या वर्षी यूएसमध्ये जाणे माझ्यासाठी एक कल्चर शॉक होता. मी कधीच कॅफेटेरियामध्ये जात नव्हते. कारण मला माहित नव्हते, की रांगेत कसे उभे राहिले जाते आणि पैसे कसे भरले जातात. वाढलेले जेवण कसे खावे हेदेखील मला माहित नव्हते. मला स्वत: मुर्ख ठरवून घ्यायचे नव्हते. म्हणून मी वेडिंग मशीनवरून चिप्स खरेदी करत होते आणि बाथरुममध्ये जाऊन खात होते. मी तेथे माझे तीन वर्षे असेच घालवले.'


पुढे वाचा, आईच्या एका निर्णयाने बदलले प्रियाकांचे आयुष्य, यासह बरंच काही...  

 

बातम्या आणखी आहेत...