आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story : चहा पिताना बिझनेसमनच्या मुलीवर जडला होता बॉबीचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉबी देओल सध्या आगामी चित्रपट 'रेस 3' मुळे चर्चेत आहे. बॉबी दिर्घकाळापासून एका  हीट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. तो म्हणतो की, त्याची बायको आणि मुलांनी त्याला कमबॅक करण्यासाठी मोटिव्हेट केले. बॉबी देओलच्या लव्ह स्टोरीविषयी खुप कमी लोकांना माहिती असेल. बॉबी देओल आणि तान्याचे लग्न   1996 साली झाले होते. तान्या मोठ्या बिझनेसमन घरातील मुलगी आहे. बॉबीच नव्हे तर सनीही करतो तिच्या कामाचे कौतुक..

 

तान्याचे 'द गुड अर्थ' नावाची स्वतःची फर्निचर आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. अनेक बॉलिवूड स्टार आणि बिजनेसमन तिचे क्लायंट आहे. तान्या डिझायनर म्हणून तिचे काम उत्तम करत आहे. तान्याने सांगितल्यानुसार, बॉबी कधीच तिच्या कामात दखल देत नाही. तान्याला घरातूनही फार सपोर्ट आहे. चांगले काम झाले की बॉबी आणि सनी भैया दोघेही माझे कौतुक करतात असे ती म्हणते. तान्याने इंटीरीअर डिझायनरचे काम केले आहे.

 

रेस्तरॉमध्ये चहा पिताना झाले एकाच नजरेत प्रेम..
 बॉबी आणि तान्या लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. बॉबी एका रेस्तरॉमध्ये मित्रांसोबत चहा पित बसला होता. त्याच रेस्तरॉमध्ये दुसऱ्या टेबलवर तान्या बसली होती. तिला पाहताच बॉबी तिच्या प्रेमात पडला. बॉबीने लगेचच तिची सर्व माहिती काढली आणि तिला भेटण्यासाठी बोलविले. बॉबी तिला घेऊन त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला मग काय दोघांचे आईवडील एकमेकांना भेटले आणि लगेचच लग्नही झाले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, पहिल्याच नजरेत धर्मेंद्र यांना आवडली तान्या..

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...