आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री राधिका आपटे सध्या ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्ये राधिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. राधिकाचा हा फोटो अनेकांच्या अंगावर काटा आणणारा आहे. होय, या फोटोत राधिकाच्या चेहऱ्यावर एक पाल चिपकलेली आहे आणि विशेष म्हणजे, राधिका जणू तिला खाण्याच्या प्रयत्न करताना दिसतेय. राधिका तिची जीभ त्या पालीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. राधिकाने या फोटोला ‘बिहाईन्ड द सीन’ असे कॅप्शन दिले आहे.
राधिकाच्या या फोटोवर युजर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने तर हा फोटो पाहिल्यानंतर राधिकाला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य एकाने राधिकाच्या हिमतीची दाद दिली आहे. कदाचित तू पहिली मुलगी आहे, जी पाल पाहिल्यानंतर अशी रिअॅक्ट झाली असेल, असे त्याने लिहिले आहे. पालीला खाण्याचा प्रयत्न करणाºया राधिकाचा हा फोटो अनेकांना किळसवाणा वाटू शकतो. पण थांबा....या फोटोबद्दल बरे वाईट निष्कर्ष काढण्याआधी आम्ही एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. ती कुठली तर राधिकाच्या चेहऱ्यावरची ती पाल नकली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘पॅडमॅन’च्या सेटवरचा असाच ‘बिहाईन्ड द सीन’ व्हिडिओ आऊट झाला होता. या व्हिडिओत अक्षयने याच नकली पालीने अनेकांना घाबरवले होते. यात राधिकाचाही समावेश होता.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'पॅडमॅन' चित्रपटाच्या सेटवरील Behind the scene फोटोज्..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.