आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी एकत्र राहायचे राज बब्बर-स्मिता, भेटा लिव्ह इनमध्ये राहिलेल्या बॉलिवूडच्या 15 जोड्यांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिची आज 31 वी पुण्यतिथी आहे. 13 डिसेंबर 1986 रोजी तिचे निधन झाले होते. मुलगा प्रतिकच्या जन्माच्या अवघ्या 15 दिवसांतच तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

 

विवाहित राज बब्बरसोबत केले होते लग्न..

स्मिता यांनी विवाहित आणि दोन मुलांचे वडील असलेल्या राज बब्बर यांच्यासोबत लग्न केले होते.  राज बब्बर यांच्यासोबत स्मिता काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे मीडियामध्ये त्यांची चर्चा झाली. नादिरासोबत लग्न झालेले असतानाही स्मिता पाटील सोबत सुरु असलेले राज यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर 80 च्या दशकात चर्चेचा विषय ठरले होते.  बॉलिवूडमध्ये राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला सुरुवात केली, असे म्हटले जाते. 

 

आईचा विरोध झुगारुन केले होते स्मिता यांनी लग्न...

स्मिता पाटील-राज बब्बर यांच्या नात्याला स्मिता यांच्या आईचा विरोध होता. महिलांच्या हक्कासाठी लढणारी स्मिता दुसऱ्या स्त्रीचा संसार कसा मोडू शकते, हा प्रश्न त्यांना सतावत असे. आईचा  विरोध झुगारुन स्मिताने राज यांच्यासोबत लग्न केले होते.

 

80च्या दशकातील धाडसी निर्णय...

ऐंशीच्या दशकात मात्र लिव्ह इनमध्ये राहणे हे मोठे धाडसी पाऊल होते. राज बब्बर यांनी समाजाच्या सर्व बंधनांना झुगारुन स्मिता पाटीलसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले. यामुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. काही दिवसांनी राज आणि स्मिता यांनी लग्नदेखील केले.

 

आताच्या काळात तर बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.

 

कोणकोणते कलाकार लिव्ह इनमध्ये राहिले, टाकुयात यावर एक नजर..

बातम्या आणखी आहेत...