आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे राज कपूर यांची नात, हिच्या जन्माच्या वेळी म्हणाले होते, \'माझ्या घरी आल्या रिद्धी-सिद्धी...\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - आजोबा राज कपूरसोबत रिद्धीमा कपूर, उजवीकडे - रिद्धीमाचे लेटेस्ट छायाचित्र - Divya Marathi
डावीकडे - आजोबा राज कपूरसोबत रिद्धीमा कपूर, उजवीकडे - रिद्धीमाचे लेटेस्ट छायाचित्र

बॉलिवूडचे प्रसिद्ध कपूर घराणे अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या घराण्याच्या मुलींनीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. करिश्मा कपूर आणि करीना कपूर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री ठरल्या. पण या घराण्यातील एक लेक मात्र फिल्म इंडस्ट्रीकडे वळली नाही. आम्ही बोलतोय ते राज कपूर यांची नात आणि ऋषी कपूर-नीतू कपूर यांची लाकडी लेक रिद्धीमा कपूर हिच्याविषयी... 


करिश्मा आणि रिद्धीमात आहे केवळ सहा दिवसांचे अंतर...
रिद्धीमा कपूर ही रणबीर कपूरची थोरली बहीण आहे. रिद्धीमा आणि तिची चुलत बहीण करिश्मा एकाच वयाच्या आहेत. या दोघींमध्ये केवळ सहा दिवसांचे अंतर आहे. दोघींच्या जन्माच्या वेळी राज कपूर म्हणाले होते, की माझ्या घरी रिद्धी-सिद्धी आल्या आहेत. त्यामुळे ऋषी कपूर यांनी त्यांच्या लेकीचे नाव रिद्धीमा असे ठेवले.

 

या पॅकेजमधून जाणून घेऊयात, काय करते रिद्धीमा, कुणासोबत झाले आहे तिचे लग्न आणि यासह बरेच काही... 

बातम्या आणखी आहेत...