आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajesh Khanna Was In Realationship With Anita Advani, Rajesh Khanna Birth Anniversary

बिग बॉसच्या या कंटेस्टंटसोबत लिव-इनमध्ये राहात होते राजेश खन्ना, केला होता प्रॉपर्टीवर दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजेश खन्ना आणि अनीता अडवाणी. - Divya Marathi
राजेश खन्ना आणि अनीता अडवाणी.

सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज (29 डिसेंबर 1942) 75वी बर्थ एनिव्हर्सरी आहे. राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया होती हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र डिंपलशिवाय त्यांच्या आयुष्यात इतर महिलाही होत्या. यातीलल एक होती टीना मुनीम आणि दुसरी अनीता अडवाणी. डिंपल आणि टीना मुनीम सोडून गेल्यानंतर त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये अनीता अडवाणीने त्यांना साथ दिली होती. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर अनीताने त्यांच्या संपत्तीवरही दावा सांगितला होता. मात्र तिला काहीही मिळाले नाही. 

 

बिग बॉस कंटेस्टंट होती अनीता... 
- बिग बॉसच्या सीजन 7 मध्ये अनीता अडवाणी कंटेस्टंट होती. अनीताने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते, 'मी लहानपणापासून त्यांची फॅन होते. मी जयपूरला शाळेत होते. सुट्यांमध्ये मुंबईला आले होते. एका फॅमिली फ्रेंडसोबत महेबुब स्टुडिओत गेले होते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा राजेश खन्ना त्यांच्या कारने बाहेर पडत होते. मग आम्हीही त्यांचा पाठलाग करत त्यांच्या घरी गेलो. माझी एक फ्रेंड त्यांना ओळखत होती, त्यामुळे आम्हाला त्यांच्या घरात एंट्री मिळाली. आम्ही चहापान केला. राजेश खन्ना यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांनी निघतांना माझा फोन नंबर मागून घेतला आणि संपर्कात राहू असे म्हणाले होते. त्यांनी मला फिल्मीची शूटिंग पाहाण्यासाठी निमंत्रित केले. त्यांना भेटून मी खूप खूश होते.'

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, अनीता आणि राजेश खन्ना यांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...