आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजपुर्वीच वादात अडकला होता रजनीकांतचा चित्रपट, गँगस्टरच्या मुलाने दिली होती धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट 'काला'ने 100 कोटींची कमाई केली आहे. परंतू चित्रपट रिलीजपुर्वीच वादात अडकला होता. मुंबईचा डॉन बोलल्या जाणा-या हाजी मस्तानच्या मुलाने चित्रपटाच्या मेकर्सला इशारा दिली होती की, जर चित्रपटात त्यांच्या वडिलांची वाईट प्रतिमा दाखवली तर याचे वाईट परिणाम टीमला भोगावे लागतील. 


पत्र लिहून दिला होता इशारा
- या वर्षी मे महिन्यात मुंबईचा डॉन म्हटल्या जाणा-या हाजी मस्तानचा मुलगा सुंदर शेखर मिश्राने खुले पत्र लिहून काला चित्रपटाच्या मेकर्सला इशारा दिला होता.
- तो मेकर्सला म्हणाला होता की, त्याचे वडील हाजी मस्तान यांची चित्रपटात वाईट इमेज दाखवू नका.
- सुंदर शेखरने लिहिले होते की, जर असे झाले तर याचे वाईट परिणाम मेकर्सला भोगावे लागतील. 
- एवढेच नाही तर चित्रपटाच्या रिलीजपुर्वी मुंबई येथील जर्नालिस्ट जवाहर नडारनेही निर्मात्यांविषयी मानहानीचा दावा केला होता. त्याने दावा केला होता की, चित्रपटात रजनीकांत जी भूमिका साकारत आहेत, ते रियल लाइफमध्ये त्याचे वडिल थिरवियम नडार आहेत. त्यांच्या वडिलांची भूमिका चित्रपटा निगेटिव्ह दाखवण्यात येत आहे. 
- तर मे महिन्यातच असिस्टेंट डायरेक्टर के राजशेखर यांनी 'काला' च्या टायटल आणि स्टोरीवर दावा करत कायदेशीर तक्रार केली होती. ते म्हणाले होते की, 1995 मध्ये त्यांनी 'काला' ची टॅगलाइन 'करिकालन' नावाने रजिस्टर केली होती. 


डायरेक्टरने दिले होते स्पष्टीकरण
डॉनच्या मुलाने आरोपांनंतर चित्रपटाचे डायरेक्टर पीए रंजीत यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्याने स्पष्टीकरण देत म्हटले होते की, 'काला' हाजी मस्तान यांचा बायोपिक नाही. ते म्हणाले होते की, 'काला'ची कथा ही पुर्णपणे काल्पनिक आहे. या चित्रपटाचे प्रोड्यूसर रजनीकांत यांचा जावई धनुष आहे. चित्रपटात रजनीकांतसोबत नाना पाटेकर आणि हुमा कुरैशी प्रमुख भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...