Home | Gossip | Rajkumar Hirani Reveals Untold And Shocking Secrets About Sanjay Dutt तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी 'संजू' वापरायची ही ट्रीक, दिग्दर्शकाने सांगितले खास किस्से

तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी 'संजू' वापरायची ही ट्रीक, दिग्दर्शकाने सांगितले खास किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2018, 01:27 PM IST

एका न्यूज वेबसाइटसोबत केलेल्या बातचीतमध्ये हिराणींनी संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला.

 • Rajkumar Hirani Reveals Untold And Shocking Secrets About Sanjay Dutt तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी 'संजू' वापरायची ही ट्रीक, दिग्दर्शकाने सांगितले खास किस्से


  -राजकुमार हिराणी यांनी संजय दत्तच्या आयुष्यातील लोकांना ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
  -गर्लफ्रेंड्स, ड्रग्स आणि वडिलांसोबतच्या नात्यावर केली चर्चा.
  -हिराणींनी सांगितले, वडिलांना सर म्हणून हाक मारायचा संजय दत्त


  मुंबईः अभिनेता संजय दत्त तरुणींना पटवण्यासाठी इमोशनली ब्लॅकमेल करायचा. याचा खुलासा त्याच्या आयुष्यावर बेतलेल्या 'संजू' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी केला आहे. एका न्यूज वेबसाइटसोबत केलेल्या बातचीतमध्ये हिराणींनी संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला. हिराणींनी सांगितले, जेव्हा संजू एखाद्या तरुणीच्या प्रेमात पडायचा, तेव्हा तो तिला आईच्या कबरजवळ घेऊन जायचा. तुला माझ्या आईच्या भेटीला आणले आहे, असे संजू त्या तरुणीला सांगायचा. अशा प्रकारे तरुणी संजय दत्तसोबत भावनिकरित्या जुळत असे. पण सत्य हे आहे, की संजय दत्त ज्या कबरीजवळ तरुणीला घेऊन जायचा ती त्याच्या आईची नसायची.


  'संजू' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये संजय दत्तच्या 308 गर्लफ्रेंड्स होत्या. तर प्रोस्टिट्युट मिळून हा आकडा 350 होता. अनेक तरुणींसोबत त्याचे शारीरिक संबंध होते.

  पुढे वाचा, राजकुमार हिराणींनी उलगडलेल्या संजय दत्तच्या आयुष्यातील पडद्यामागील गोष्टी...

 • Rajkumar Hirani Reveals Untold And Shocking Secrets About Sanjay Dutt तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी 'संजू' वापरायची ही ट्रीक, दिग्दर्शकाने सांगितले खास किस्से

  - मुलाखतीत हिराणी यांनी संजय दत्तच्या आयुष्यातील ब-याच गोष्टी उघड केल्या. एकदा संजय दत्तचे ब्रेकअप झाले होते, तेव्हा तो कार घेऊन गर्लफ्रेंडच्या घराबाहेर पोहोचला. घराबाहेर आणखी एक कार उभी होती. संजयने रागाच्या भरात उभ्या असलेल्या कारला जोरात धडक मारली. पण नंतर कळले, की ती कार तरुणीच्या बॉयफ्रेंडची नव्हती. पण या घटनेत दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले होते.

   

   
 • Rajkumar Hirani Reveals Untold And Shocking Secrets About Sanjay Dutt तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी 'संजू' वापरायची ही ट्रीक, दिग्दर्शकाने सांगितले खास किस्से

  - आणखी एक किस्सा शेअर करताना हिराणी यांनी सांगितले, एकेकाळी संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेला होता. एकदा ड्रग्सच्या नशेत संजय त्याचे वडील सुनील दत्त यांना भेटायला पोहोचला. तेव्हा वडिलांच्या डोक्यावर मेणबत्ती पडल्याचा त्याला भास झाला आणि तो ती विझवण्याचा प्रयत्न करु लागला. संजय नेमके काय करतोय, हे सुनील दत्त यांना समजले नव्हते. हिराणींनी सांगितले, की संजय त्याच्या वडिलांना सर म्हणून हाक मारायचा.

 • Rajkumar Hirani Reveals Untold And Shocking Secrets About Sanjay Dutt तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी 'संजू' वापरायची ही ट्रीक, दिग्दर्शकाने सांगितले खास किस्से

  29 जून  रोजी रिलीज होतोय 'संजू'

   

  - 'संजू' हा चित्रपट येत्या 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर असून त्याच्या वडिलांच्या म्हणजे सुनील दत्त यांच्या भूमिकेत अभिनेता परेश रावल आहेत.  आई नर्गिसची भूमिका अभिनेत्री मनीषा कोइराला वठवतेय. हिराणी यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटात त्यांनी संजय दत्तच्या आयुष्यातील दोन गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. ड्रग्स आणि बॉम्ब ब्लस्टवर चित्रपटात फोकस करण्यात आला आहे.  

Trending