आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियासोबत लग्न करण्यास सज्ज आहे रणबीर कपूर! एक्स गर्लफ्रेंडचे आहे यात खास कनेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुष्का, सोनम यांच्या लग्नानंतर आता रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकाच्या लग्नाची सतत चर्चा होत आहे.  अशी बातमी आहे की दीपिका यावर्षी नोव्हेंबरपर्यंत लग्न करु शकतात. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची चर्चा आहे. दोघांनी त्यांचे रिलेशनशीपही सर्वासमोर स्वीकारले आहे. आता या दोघांनी त्यांच्या अफेअरबद्दल उघडपणे सांगितले आहे तर आता हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्नांचा भडीमार त्यांच्याकडून होत आहे.

 

आगामील चित्रपट संजूच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर फॉक्स स्टार इंडियाच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरुन त्यांच्या फॅन्सशी संवाद साधला. यावेळी रणबीरने त्याच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल लोकांना सांगितले. यावेळी एका यूजरने रणबीरला त्याच्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने आशा करतो की खूप लवकर असे उत्तर दिले. रणबीरच्या या उत्तराला आलियाशी जोडले जात आहे. 

 

याअगोदर आलियाने तिच्या लग्नाबद्दलही सांगितले होते. ती म्हटली होती की, लोकांना कदाचित वाटत असेल की मी वयाच्या तिशीनंतर लग्न करेन पण तसे काही नाही. मी त्याअगोदर लग्न करुन प्रेक्षकांना सुखद धक्काही देऊ शकते. पण मी सांगितलेली कोणतीच गोष्ट ही काळ्या दगडावरची रेष नाही असेही तिने स्पष्ट केले.

 

रणबीर कपूर आणि आलिया करण जोहरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात सोबत झळकणार आहेत. पडद्यावर सर्वप्रथमच ही जोडी आपल्याला दिसणार आहे. चित्रपटात मौनी रॉय, अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका आहे. अयान मुखर्जी यांचा हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवरील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...