आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजू'साठी पहिले रणबीरने कमी केले आणि नंतर वाढवले 15 KG वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक सिनेमा 'संजू' लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. चित्रपटात रणबीरचा लूक पुर्णपणे संजय दत्तसारखा दिसतोय. याची झलक चित्रपटाचे टीजर, ट्रेलर आणि पोस्टर्समध्ये दिसली आहे. परंतू रणबीरसाठी हा प्रवास सोपा नव्हता. संजय दत्तच्या भूमिकेत पुर्णपणे रुजण्यासाठी, आपली चाल आणि वेशभूषेसोबतच वजनावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे होते.


- 'संजू' मध्ये संजय दत्तसारखा लूक मिळवण्यासाठी रणबीर कपूरला खुप मेहनत करावी लागली होती.
- त्याने संजयसारखे बनण्यासाठी आणि दिसण्यासाठी अनेक महिने मेहनत केली.
- 'संजू' साठी रणबीरला पहिले 10 किलो वजन कमी करावे लागले होते. नंतर संजय दत्तच्या आयुष्यातील दूसरा भाग दाखवण्यासाठी त्याला 15 किलो वजन वाढवावे लागले.
- राजकुमार हिरानी व्दारे लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दीया मिर्जा आणि सोनम कपूरसारख्या कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहे. विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी व्दारे निर्मित हा चित्रपट 29 जून, 2018 ला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...