आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ranbir Kapoor Look In Sanjay Dutt Biopic संजय दत्त बायोपिक, संजू, बॉलिवूड चित्रपट

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'संजू'मध्ये हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय रणबीर, तुम्ही पाहिलेत का हे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या संजू या आगामी चित्रपटाचा टीजर मंगळवारी रिलीज झाला आहे. 1 मिनिटं 25 सेकंदांच्या या व्हिडिओत रणबीर कपूर संजय दत्तच्या आजवरच्या विविध लूकमध्ये दिसतोय. टीजरची सुरुवातील तुरुंगातील दृश्याने होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगातून बाहेर पडत असताना संजू (रणबीर) त्याच्या आयुष्याची स्टोरी सांगतोय. चित्रपटातील प्रत्येक लूकमध्ये रणबीर हुबेहुब संजय दत्तची कॉपी दिसतोय. 


मान्यताच्या भूमिकेत दीया मिर्झा तर आई नर्गिसच्या भूमिकेत आहे मनिषा कोइराला... 
- या चित्रपटात संजय दत्तची पत्नी अर्थातच मान्यता दत्तची भूमिका अभिनेत्री दीया मिर्झा हिने साकारली आहे. तर आई नर्गिसच्या भूमिकेत मनिषा कोइराला आहे. तर संजयच्या पुर्वाश्रमीच्या प्रेयसी टीना मुनीमच्या भूमिकेत सोनम कपूर आणि माधुरी दीक्षितच्या भूमिकेत करिश्मा तन्ना आहेत.
- याशिवाय या चित्रपटात अनुष्का शर्मा, परेश रावल, जिम सर्भ, विकी कौशल, तब्बू आणि बोमन इराणी या कलाकारांनीही काम केले आहे. येत्या 29 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, संजय दत्तच्या आजवरच्या विविध लूकमध्ये कसा दिसतोय रणबीर कपूर...  

बातम्या आणखी आहेत...