आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजल अग्रवालला या अभिनेत्याने शूटिंगदरम्यान केले होते जबरदस्ती किस, मग घडले असे काही..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सिंघम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आज तिला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. काजलची मोठी बहीण निशासुद्धा अभिनेत्री आहे. तिने तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे.

 

काजलने सेंट एनी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे जे मुंबईतील सर्वात टॉप स्कुलमध्ये गणले जाते. त्यानंतर काजलने मुंबई येथील केसी कॉलेजमधून मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने तिला मॉडेलिंग करायचे असल्याचे ठरवले होते. यासाठी तिने तयारीही सुरु केली.

 

फायनल ईअरपर्यंत काजलने मॉडेलिंग करण्यास सुरुवता केली. तिने बॉलिवूड चित्रपट क्यो हो गया ना मध्ये डेब्यू केला. यात ती दीया मिर्झाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. यानंतर तिने दिग्दर्शक तेजा यांचा चित्रपट 'लक्ष्मी कलयाणम'मधून कल्याण राम या अभिनेत्यासोबत तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

 

काजल अग्रवालसोबत अनेक विवादही जोडले गेले, 2014 साली तिने एफचएम मॅगजीनसाठी टॉपलेस फोटोशूट केले. पण काजोलने तिने असे फोटोशूट केले नाही आणि त्या फोटोसोबत छेडछाड केली गेली असल्याचे सांगितले होते. 

 

बॉलिवूड चित्रपट 'दो लफ्जों की कहानी'मध्ये काजल आणि रणदीप हुड्डा यांचा लीपसॉक सीन होता. पण त्या सीनबद्दल तिला अगोदर कल्पना नव्हती आणि अभिनेता रणदीपने तिला अचानक किस केले होते. त्यानंतर काजल नाराज होऊन सेटवरुन निघून गेली होती. नंतर फिल्ममेकर्सच्या समजावण्यावरुन काजल सेटवर परतली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, काजल अग्रवालचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...